शिवसेनेने मिळवून दिला वंचित महिला लाभार्थींना न्याय

907

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

केंद्र पुरस्क्रूत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील(60वर्षांपेक्षा कमी) कर्ता स्त्री/पुरूष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांना शासन निर्णयाप्रमाणे कमीत कमी15दिवस ते जास्तीत जास्त 1महिन्यांच्या आंत संबंधित कुटुंबाला एक रकमी रू.20,000/-इतके अर्थसहाय्य देण्यात यावे जेणेकरून संबंधित कुटुंबाला थोडा का होईना आधार मिळेल या चांगल्या हेतुने शासना तर्फे ही योजना राबवली जात आहे व याचे सर्वस्वी अधिकार मा.तहसीलदार यांन या करिता ग्राम स्तरावर सरपंच , ग्रामसेवक,आशा वर्कर,अंगणवाड़ी सेविका, तलाठी इ.घटकानी समन्वयाने काम करावे बाबत शासन निर्णय क्रमांक राकुला-2012/प्रक- 277/विसयो-2दिनांक12मार्च 2013रोजी पारीत असताना देखील वरील संबंधीत घटक या योजनेची अंमलबजावणी तर करत नाही पण सामाजिक घटकांकडून तयार प्रकरणे देखील वर्ष,सहामहिने रेंगाळत राहतात सदरची प्रकरणे रेंगाळत राहु नये म्हणून शासन निर्णय संदर्भ क्रमांक3मधे सुधारणा करुण असे म्हटले आहे की, यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिला ही प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार होता मात्र ही केंद्र शासनाची योजना आहे या योजनेत15दिवसांत लाभ द्यावयचा आहे किंबहुना या योजनेची अंमलबजावणी राज्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे या बाबी लक्षात घेऊन या योजने मधे अर्थ सहाय्य मंजुरीचे काम पहणाऱ्या तहसीलदार यांना देण्यात आलेले असताना देखील वर्ष सहा महीने सदरची प्रकरणे रेंगाळत राहणे ही खेदाची बाब तर आहेच पण शासनाच्या निर्णयाचे देखील उलंघन करणारी आहे म्हणून तात्काळ संबंधित लाभार्थिना या योजनेचा लाभ मिळावा दूसरी बाब म्हणजे शासन निर्णयात नमूद18ते59 वयोगटातील(60वर्षापेक्षा कमी) असलेल्या कर्ता स्त्री/पुरुष यांना लाभ द्यावा असे असतांना59 वर्षे7महीने वयातील लाभार्थ्यांना सदर योजनेच्या लाभापासुन वंचित ठेवण्यात येते जर शासनाच्या नेमलेल्या अधिकाऱ्यांना शासनाने लिहिलेल्या शासन निर्णय समजत नसेल तर यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती?की जाणून बुजुन गं.भा.रेखा वसंत मुडावडकर व गं.भा. कल्पनाबाई नामदेव पाटिल , दोन्ही रा.मु.पो.जूनी महादेव गल्ली नवापुर ता.नवापुर जि. नंदुरबार या वंचित कुटुंबाला या योजनेपासुन लांब ठेवले या बाबत खुलासा व्हावा व संबंधित कुटुंबाला त्यांचा न्याय हक्काचा लाभ मिळावा अन्यथा शिवसेना मोठे जन आंदोलन करेल बाबत संबंधित अधिकारी या विषयाची दखल घ्यावी मात्र प्रकरण जमा करून वर्षावर कालावधी लोटला तरीदेखील संबंधित कुटुंब हे सदर योजनेच्या लाभापासुन वंचित होते संबंधित अधिकार्यांना जाग यावी म्हणून वेळोवेळी तोंडी सांगुनदेखील न्याय मिळात नव्हता म्हणून दिनांक 04.07.2019रोजी या वंचित कुटुंबातील महिला व त्यांच्या कुटुंबियांसह तहसीलदार, नवापूर यांना लेखी पत्राने कळविले मात्र त्यास देखील1 महिन्याच्या काळ लोटला परंतु, संबंधित वंचितांचा न्याय मिळाला नाही म्हणून नवापूर शिवसेना तर्फे संबंधित विभागाला जाग यावी याहेतुने व सनदशीर मार्गाचा अवलंब करून नवापूर शिवसेना तर्फे घंटानाद केला याची दखल घेऊन या जाड चामडीच्या अधिकार्यांना शेवट जाग आली खरी व वंचित लाभार्थ्यांना अखेर न्याय मिळाला या त्या प्रसंगी वंचित लाभार्थी ग.भा कल्पनाबाई नामदेव पाटील दूसर्या वंचित लाभार्थी ग.भा रेखाबाई वसंत मूडावदकर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गणेश वडनेरे यूवा सेना शहर अधिकारी राहुल टिभे यूवासेनेचे उप तालुका अधिकारी दिनेश भोई व किशन कोळी राकेश दूबळा अक्षय वसंत मुडावदकर प्रकाश नामदेव पाटील उपस्थित होते