कोंढव्यातील अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

1214

कोंढवा प्रतिनिधी,

आज सकाळी 7:30 ते 7:45 दरम्यान सय्यद जाफर वय 58, हे त्यांची पत्नी नसरीन जाफर सय्यद वय 50 वर्षे त्यांच्या होंडा डिओ गाडीवरून जात असताना कोंढवा मुख्य रस्त्यावरील संत गाडगेमहाराज शाळेसमोरील शिवनेरीनगर येथील क्रॉसिंग जवळ डपंर क्रमांक MH12 EF 1477 च्या चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर नसरीन सय्यद यांच्या पोटावरुन व पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले आहे.
याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविले होते परंतु जवळपास अर्धा तास होऊन देखील कोणताही पोलीस कर्मचारी आले नव्हते. यानंतर एक कर्मचारी आला व त्याने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला असता ते सुद्धा 15 मिनिटांनंतर आले यावेळी रुग्ण वाहिकेतील डॉक्टरांनी संबधित महिलेला मयत घोषित केले. ते तेथून निघून जाऊ लागले परंतु पोलिसांनी त्यांना मयत महिलेला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले परंतु आम्ही मयत व्यक्तीला या रुग्णवाहिकेत नेत नाही असे सांगू लागला , यानंतर पोलीस व रुग्णवाहिकेचा चालक यांच्या दरम्यान थोडी घमासान झाली. परंतु थोड्याच वेळात खाजगी रुग्णवाहिका आल्याने पोलिसाने त्या रुग्णवाहिकेला जाऊ दिले.

मयत महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोशाने येथील उपस्थित नागरिकांची मने हेलावली होती.बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलीस सर्वाना बाजूला करत होते. तर येथील वेताळ मित्र मंडळाचे कार्यकर्ते, कोंढव्यातील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक सुरळीत करत होते.

वास्तविक कोंढवा गावठाणातून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील अवजड वाहतूक सुरू आहे. यामुळे असे अपघात होत आहेत.तर आता मोठे टेम्पो तसेच इतर छोट्या वाहनांना देखील कोंढवा गावातून बंदी करण्यात यावी अशी मागणी कोंढवा खुर्द ग्रामस्थांनी केली आहे किंवा वीर नरवीर तानाजी मालुसरे चौकात मोठे बॅरिकेट्स लावावे असे ही काही नागरिकांनी सुचविले आहे.
ज्या डंपरमुळे हा अपघात झाला त्या डंपरवर पुढील बाजूस नंबर प्लेट देखील नव्हती.