शिवसेना नेते विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका

2323

पुणे प्रतिनिधी,

शिवसेना नेते आणि पुंरधर विधानसभा मतदार संघाचे आमदार, राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान त्यांची प्रकृती ठीक आहे , अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मल्हार न्यूजशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी तसेच नेतेमंडळीची रीघ लागली आहे.

विजय शिवतारे यांनी आपल्या मतदार संघात विविध प्रकारच्या विकासकामांचा डोंगर उभा केला असून त्यांना पुरंधरच्या विकासाचे शिल्पकार असे संबोधले जाते.दरम्यान शिवतारे यांची प्रकृती ठीक आहे, काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे डॉकटरांनी सांगितले.