जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना तीन वर्षात गती

864

शैलेंद्र चौधरी,

नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकांतर्गत गेल्या तीन वर्षात विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली असून या हे प्रकल्प पुर्ण झाल्यावर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम 2015 मध्ये सुरू करण्यात आले पहिल्या टप्प्याच्या 8 किलोमीटर पाईप लाईनचे 90 टक्के व दुसऱ्या टप्प्यातील 6 किमी पाईपलाईनचे 70 टक्के काम पुर्ण करण्यात आले आहे. जॅकवेलचे जमीन तलांकापर्यंत 20 मीटरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. येथ्या एप्रिल महिन्यापर्यंत दोन टप्पे कार्यान्वित करण्याचे नियोजन असून त्यामुळे 2 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे जिल्ह्यात प्रथमच शिवण मध्यम प्रकल्पांतर्गत पारंपरिक कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन प्रणालीचे काम पुर्ण करण्यात येऊन 829 हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बिलाडी ल.पा. योजनेसाठी भूसंपादनाची प्रक्रीया वेगाने सुरू आहे.
तळोदा तालुक्यातील धनपूर ल.पा.योजनेअंतर्गत धरणाची 2017 मध्ये घळभरणी करून 3.18 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली असून शेतकऱ्यांना उपलब्ध सिंचनाचा लाभ होत आहे या धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे 490 हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे नियेाजन आहे याचा तालुक्यातील इच्छागव्हाण ल.पा.योजनेचे भूसंपादना
अभावी बंद असलेले काम दोन वर्षात वन जमिनीचे संपादन करून सुरू करण्यात आले डिसेंबर अखेर घळभरणी करून 2.61 दलघमी पाणीसाठा निर्मित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रापापूर प्रकल्पबाधितांच्या विरोधामुळे बंद असलेले काम प्रकल्पबाधितांशी संवाद साधून मे 2019 पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे 555 हे.क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे अक्कलकुवा तालुक्यातील 18 वर्षापासून बंद पडलेले रामपूर प्रकल्पाचे काम भूसंपादनाचा प्रश्न सोडवून जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आले आहे दीड वर्षात प्रकल्प पुर्ण झाल्यावर 354 दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे देहली मध्यम प्रकल्पाचे काम 35 वर्षापासून रखडलेले होते गेल्या तीन वर्षात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवून बांधकाम पुर्णत्वास आले आहे चालु वर्षी घळभरणी पुर्ण झाल्यावर 19 दलघमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या 11 किमी कालव्याचे काम 90 टक्के झाले आहे नवापूर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पात 11.49 दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून गेल्या तीन वर्षात डावा व उजवा कालव्याचे काम वितरीकांसह पुर्ण करण्यात आले आहे त्याद्वारे 2 हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण झाली आहे नागन प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामालाही गती देण्यात आली असून यावर्षीच्या रब्बी हंगामात 350 हे. क्षेत्र सिंचन क्षमता साध्य करण्यात आली आहे. कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे कामदेखील पुर्ण झाले आहे. भूरीवेल धरणाचे घळभरणी करून 3.64 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे 761 हेक्टर क्षेत्र सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील 14 व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 8 अशा गेल्या 30 वर्षापासून बंद पडलेल्या 22 सहकारी उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामास शासनाने विशेष बाब म्हणून 41 कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली. त्यापैकी 6 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येऊन चाचणी घेण्यात आली आहे जुन्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामदेखील करण्यात येत आहे. इतरही 10 योजना कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत येत्या दीड वर्षात या योजनांमुळे 14 हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियेाजन आहे.

वरील सर्व प्रलंबित प्रकल्पास निधी उपलब्ध करून धरणासह कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून अभिनव पद्धतीने पूर्ण करून येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये तेवीस हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती चे नियोजन करण्यात आलेले आहे.