विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

1357

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

एकही पात्र शिधापत्रिकाधारक पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत धान्यापासून व गॅस जोडणीच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनतर्फे प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनी गॅस जोडणीसाठी विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे योजनेअंतर्गत पात्र कार्डधारकांना केवळ 100 रुपये भरुन गॅस जोडणी मिळणार असून उर्वरित खर्च शासन करणार आहे अंत्योंदय योजनेचा इष्टांक 1 लाख 6 हजार 698 कार्ड व प्राधान्य योजनेसाठी 7 लाख 36 हजार 69 युनिट असे एकूण 12 लाख 65 हजार 760 पात्र व्यक्तींना अन्नधान्य लाभ देण्यात येत आहे इष्टांक पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44 हजार व शहरी भागात 59 हजार उत्पन्न असलेल्या व सध्या धान्य मिळत नसलेल्या एनपीएच योजनेतील केशरी कार्ड धारकांकडून हमीपत्र भरुन घेण्याचे तसेच प्राधान्य योजनेत आलेले हमीपत्र तपासुन पात्र कार्ड धारकांना समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे
जिल्ह्यातील ज्या कुटुंबांकडे अंत्योदय व प्राधान्य योजनेची शिधापत्रिका आहे परंतु गॅस कनेक्शन नाही अशा उज्वला योजनेसाठी पात्र असणाऱ्या कार्डधारकांकडून विस्तारीत उज्वला योजनेचे अर्ज स्वस्त धान्य दुकानदार यांचेमार्फत भरुन घेण्यात येत आहेत. तपासणीनंतर पात्र असणाऱ्या कार्ड धारकांना गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत आहे.
जे कार्डधारक रॉकेलचे हमीपत्र भरुन दिलेले असल्याने रॉकेल घेत आहेत त्या कार्डधारकांनी प्राधान्यांने विस्तारीत उज्वला योजनेचे फॉर्म भरुन घ्यावेत त्या कार्डधारकांना माहे सप्टेंबर 2019 पासून रॉकेलचे वितरणी केले जाणार नाही याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी या योजनेचा जास्तीत जास्त कार्डधारकांनी लाभ घेऊन गॅस कनेक्शन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0
मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना(मधमाशा पालन)संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली असून या योजनेसाठी पात्र व्यक्ती/संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा व त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे स्वता:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल अर्जदारास मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणा प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ येाजनेअंतर्गत संस्था किंवा व्यक्तिला प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावा व त्याचे वय वर्षे 22 पेक्षा जास्त असावे अशा व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतीजमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी केंद्र चालक संस्था प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी व संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेली 1 एकर शेतजमीन असावी प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हार चौ.फुट. क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण,साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक असते. योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधनपत्र लिहून देणे व मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे या योजनेचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरु शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रविंद्र अकोले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला, रूम नं. 222, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत ,जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी 02564 -210053 व संचालक,मधसंचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं.5 महाबळेश्वर जि.सातारा दुरध्वनी 02168-260264 येथे संपर्क साधावा.
0 0 0 0 0 0 0 0
ग्रामीण भागात महिलांसाठी न्हाणीघर व शौचालय
जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील गावात महिलांना 14 वा वित्त आयोग आणि 5 टक्के पेसाच्या निधीतून पाच न्हाणीघर आणि दोन शौचालय बांधण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी दिले आहे बऱ्याच गावात महिलांना आंघोळ व शौचालयासाठी सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागास या सुविधा निर्माण करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.न्हाणीघराच्या वरती 2 हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात. एक पाण्याच्या टाकीला सोलर पॅनल बसविण्यात यावे.या टाकीतील पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी व दुसऱ्या टाकीतील पाण्याचा उपयोग शौचालयासाठी होईल.
न्हाणीघराच्या निघणाऱ्या पाण्यासाठी शोषखड्डा तयार करण्यात यावा.अधिक लोकसंख्येच्या गावात युनिटच्या संख्येबाबत गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावा.या कामांचा समावेश ग्रामपंचायतीच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ आरखड्यात प्राधान्याने करावा, असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
—–
22 उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठीच सुधारीत अहवाल सादर
तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामांचा प्रस्तावित सुप्रमा अहवाल 110 कोटी मंजुरीच्या पुढील कार्यवाहीसाठी महामंडळास सादर करण्यात आहे या सर्व योजना 25 ते 30 वर्षापूर्वी बांधण्यात येऊन 4 ते 5 वर्षे कार्यान्वित होत्या. योजनेसाठी पाणी अपुरे पडू लागल्याने या योजना हळूहळू बंद पडल्या.तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज येथे पाणीसाठा झाल्याने या योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत होती योजनांच्या दुरुस्तीच्या कामास जून 2016 मध्ये 41.78 कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे धुळे जिल्ह्यातील 8 योजना शिंदखेडा तालुक्यातील असून 26 गावांना त्याचा लाभ होणार आहे.या येाजनेमुळे 5 हजार 223 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 33.80 दलघमी पाणी वापर सुरू होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील 6 व शहादा तालुक्यातील 8 अशा एकूण 14 योजनांचा 33 गावांना लाभ मिळणार आहे. त्याद्वारे 9 हजार 190 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 56.70 दलघमी पाणी वापर सुरू होणार आहे. या तिनही तालुक्यातील 7 हजार 342 शेतकऱ्यांचे 14 हजारपेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजनेच्या दुरुस्तीतील तांत्रिक अडचणींमुळे व काही ठिकाणी जुने पाईप फुटलेले असल्याने दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यानुसार सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे त्यात तापी जलविद्युत विभागाच्या अतिरिक्त कामांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
या 22 पैकी धुळे जिल्ह्यातील दाऊळ-मंदाणे, दाऊह व जयभवानी उ.सिं.यो.निमगुळ, विध्यासिनी,धमाणे या तीन योजना व नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरतापी तिरे, बिलाडी, हरीतक्रांती,लपुसनद व दत्त सारंगखेडा या तीन अशा सहा योजनांची पंप बसवून चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीदरम्यान आढळलेले लिकेज दुरुस्तीचे कामदेखील मान्यता घेऊन करण्यात येणार आहे.
—-
चार अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद

प्रचलित नियंमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार अनुज्ञप्तींचे व्यवहार बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहे जागेत प्रोहिबिशन गुन्हा दाखल असताना व प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हॉटेल साईनीच्या नावे अनुज्ञप्ती मंजूर करण्यात आली होती. सदर अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत मौजे शेजवा व शनिमांडळ येथील बिअर शॉपी नियमात तरदूत नसताना शहरात स्थलांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली होती महाराष्ट्र दारुबंदी कायदा-1949 व मुंबई विदेशी मद्य नियम 1953 मध्ये बिअर शॉपी अनुज्ञप्ती स्थलांतराची तरतूद नसल्याने ती परवानगी रद्द करून व्यवहार बंद करण्यात आले आहेत नंदुरबार तालुक्यातल मौजे दुधाळे शिवार येथील बिअर शॉपीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनुज्ञप्तीधारक व तक्रारदार यांना समक्ष बोलावून त्यांची बाजू ऐकण्यात आली. पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीत अनुज्ञप्तीसाठी आवश्यक ग्रामसभा ठराव व ना-हरकत दाखला सादर न केल्याने हे कागदपत्रे सादर करेपर्यंत अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड यांनी कळविले आहे.

आहार पुरवठ्यासाठी महिला बचत अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील 2 हजार 440 अंगणवाडी केंद्रासाठी पोषण आहार (गरम व ताजा अंगणवाडी केंद्रातील बालकांना खाऊ घालण्यासाठी) व घरपोच आहार घरी नेऊन खाण्यासाठी स्थानिक महिला मंडळ, महिला संस्था, महिला बचतगट यांचेकडून ई-निविदा जिल्हा परिषद नंदुरबारच्यावतीने अभिव्यक्ती स्वारस्याने मागविण्यात येत आहे. त्यासाठीचे अर्ज 9 सप्टेंबर 2019 पर्यंत www.mahatendrs.gov.in व www.maharashtratenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्यासाठी इच्छुक स्थानिक महिला मंडळ,महिला संस्था, लमहिला बचत गट यांनी ई-निविदा भरावी असे,आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास जिल्हा परिषद यांनी केले आहे,
0 0 0 0 0 0 0 0 0
अटल महापणन अभियानाअंतर्गत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

अटल महापनन अभियांनाअंतर्गत जनजागृती व लोकसंवाद मोहिमेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
यावेळी सहाय्यक निबंधक नीरज चौधरी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अजिंक्य चौधरी, डीडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी दंगल पाटील, सरव्यवस्थापक पी.एस.चौधरी बँकचे कर्मचारी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते.यावेळी चाळक म्हणाले,महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोउद्योग मंत्रालयामार्फत सहकारी संस्थेच्या बळकटीकरण करण्यासाठी अटल महापणन अभियानास 25 डिसेंबर 2016 पासून सुरुवात करण्यात आली आहे.‘अनुदानातून नव्हे योगदानातून’ हे ब्रीद वाक्य घेऊन सुरु करण्यात आलेल्या या अभियानातून विविध कार्यकारी सोसायटी व तालुका खरेदी विक्री संघ यांनी विविध प्रकारचे व्यवसाय चालू करुन आर्थिक व सामाजिक विकास साधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत एकूण 57 व्यवसाय सुरू झाले आहे. त्यात तांदूळ-तूरदाळ विक्री, मसाला विक्री, खते, बी बियाणे विक्री, गोडावून भाड्याने देणे, झेरॉक्स व स्टेशनरी दुकान अशा विविध व्यवसायांचा समावेश आहे. त्यातून आतापर्यंत एकूण 12 लाखापेक्षा अधिक उलाढाल झाली आहे, असे सांगितले.
यावेळी सहाय्यक निबंधक व जिल्हा व्यवस्थापक यांच्या हस्ते क्षणचित्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. चौधरी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.
0 0 0 0 0 0 0 0

वैद्यकीय दंत व महाआरोग्य शिबीराचे आयोजन
जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 24 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीर जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी केले आहे.