आदर्श शैक्षणिक समूहाचे विसपुते यांना लोकमत पनवेल गौरव पुरस्कार २०१९ ने सन्मानित

682

गिरीश भोपी, पनवेल

आदर्श शैक्षणिक समूहाचे श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेल “लोकमत पनवेल गौरव पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात आले.
आदर्श म्हणजे सामाजिक बांधिलकी,आदर्श म्हणजे कार्यातील तत्परता,आदर्श म्हणजे इतरांसाठी प्रेरणा… आणिआदर्श म्हणजे खऱ्या अर्थाने आदर्श.
शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी सोबतच सामाजिक क्षेत्रात देखील आदर्श शैक्षणिक समूहाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे… आदर्श समुहाची ही आगळीवेगळी कामाची पद्धत पाहून विविध सामाजिक संस्था व शासनाने देखील वेगवेगळ्या प्रसंगी आदर्श समूहाला विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे.
आदर्श समूहाच्या या यशाचे खरे गमकl म्हणजे…
आदर्श समूहाचे आधारस्तंभ,आदर्श समूहाचे खंबीर नेतृत्व ,आदर्श समूहाचा कणा, आणि आदर्श समूहाचे सर्वेसर्वा,खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्ती सामान्यातील एक असामान्य व्यक्तीमत्व प्रत्येक कार्याच्या वेळी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणारे. दातृत्व व कर्तृत्व यांचा दुहेरी संगम ज्यांच्या नेतृत्वात आहे असे आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या कार्यतत्परतेमुळे आदर्श समूहाच्या श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेजला आज दि.२२/०८/२०१९ रोजी रायगडचे पालकमंत्री मा.श्री.रवींद्रजी चव्हाण, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.गणेशजी देशमुख व माजी खासदार मा.श्री.रामशेठजी ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्तेl “लोकमत पनवेल गौरव पुरस्कार २०१९” नी सन्मानित करण्यात आले. आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका सौ.संगिता विसपुते यांनी सदर पुरस्काराचा स्वीकार केला.