लोणी काळभोर पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा

1070

लोणी काळभोर , महेश फलटणकर

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व  लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर येथे कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा पकडला असुन  यामध्ये आयशर टेम्पो व महिंद्रा पिकअप जप्त करण्यात आली आहे तर  दोन जणास ताब्यात घेतले  आहे.या कारवाईत 50 लाख 45 हजाराचा माल जप्त करण्यात आला.

         लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका बातमीदाराकडून पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना माहिती दिली की,आज शनिवारी सकाळी अंबरनाथ मंदिराजवळ असलेल्या तरवडी वस्ती येथे खंडोबा मंदिराशेजारी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची पोती भरलेला आयशर टेंम्पोमधून ही पोती पिकअप टेंम्पो मध्ये खाली केले जात आहेत.यावर त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये कार्यावर असलेल्या सहाय्यक  पोलिस निरिक्षक शिवाजी ननवरे व संदीप बोरकर यांना याची माहिती दिली त्यावर त्यांनी पोलिस हवालदार चमन शेख, नितीन गायकवाड, पोलिस नाईक, परशराम सांगळे, पोलिस काॅन्सटेबल सागर कडू याच्यासह  पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, विजय कांचन, पोलिस शिपाई धीरज जाधव यांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली व यावेळी तेथे आयशर टेम्पो एम एच 04 एच वाय 3755 यात मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटक  दिसून आला तो पिक अप एम एच 12 एन एक्स 7997 मध्ये भरला जात असताना त्यावेळी नवनाथ नामदेव काळभोर व महेश वालचंद जगताप रा. लोणी काळभोर यांना ताब्यात घेतले  तर टेंम्पो चालक फरारी झाला आहे.त्यानंतर ही दोन्ही वाहने पोलिस स्टेशन येथे आणली.या कारवाई नंतर याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवण्यात आले. दुपारी या विभागाचे पथक लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे पोहोचल्यावर दोन्ही गाड्यातील गुटक्याच्या पोत्याची मोजणी करुन पंचनामा करण्यात आला.यामध्ये विमल कंपनीचा पान व तंबाखू गुटका रु.38 लाख 45 हजार 288 ची पोती तसेच दोन टेम्पोची किंमत रु.12 लाख असा एकुण रु.50 लाख 45  हजार 288 किमतीचा माल जप्त करण्यात आला. 

       पुणे ग्रामीणचे  पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, तसेच विभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने मोठी कारवाई केली.