Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeउत्तर-महाराष्ट्रनंदुरबारसातपुड्याच्या अतिदुर्गम पूरग्रस्त आदिवासी बांधवांना शिवसेनेची मदत

सातपुड्याच्या अतिदुर्गम पूरग्रस्त आदिवासी बांधवांना शिवसेनेची मदत

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त आदिवासी बांधवांसाठी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विनंतीवरून पाठविलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत कुवरखेत या गावी करण्यात आले यावेळी नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी व उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी अतिवृष्टीमुळे अक्कलकुवा व धडगांव या दोन्ही तालुक्यातील आदिवासी बांधवांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती थोरात यांना दिलीशासनाच्या मदतीची वाट न पाहता उध्दवसाहेबांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी
एक ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या धडगांव तालुक्यातील कुवरखेत या गांवी वेलखेडी,वाटलदीपाडा, आसपासच्या गांवातील जवळपास एकूण 800 कुटुंबियांना तांदूळ, डाळ,गहू,
पीठ,मीठ,तेल,बिस्किटे,
महिलांना साड्या व सॅनिटरी नॅपकिन्स,पातेले,ताट, बादल्या
टब वृद्ध पुरुषांना ब्लॅंकेट्स व चादरी,लहान मुलांना चिवडा,
बिस्किटे व खाऊ देण्यात आला मिनाक्षी पराडके व यमुना वळवी यांच्या हस्ते महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या गावकऱ्यांना संकट काळातील शिवसेनेची ही जीवनावश्यक वस्तूंची मदत ही धीर देणारी ठरली अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कुवरखेत गांवातील सोगला हुण्या वसावे वय 58 वर्षे हा पुरात वाहून गेल्याने मयत झाला त्याच्या विधवा पत्नी बुसरीबाई सोगला वसावे यांना आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तू थोरात यांनी सुपूर्द केल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते ती अभागी महिला एकच वाक्य बोलली
माहू लागो… माआ माटी गोयु ते आखो गोयो म्हणजे मला वाटलं की माझा माणूस गेला म्हणजे सगळं संपलं पण तसं नाही योग्यवेळी शिवसेना मदतीला धावून आली मत मागण्यासाठी तर सगळेच पक्ष येतात पण मदत करण्यासाठी फक्त शिवसेनाच दारापर्यंत पोहोचते या थोरात यांच्या वाक्याने आदिवासी बांधवांना शिवसेनेच्या आपुलकीनं आपलंसं केलं साहित्य वाटपानंतर परतत असतांना गुंडांचापाडा जवळील नद्यांच्या त्रिवेणी संगमाजवळ एक तरुण दाम्पत्य हात देऊन गाड्या थांबवित होते थोरात यांनी गाडी थांबवून त्या दाम्पत्याची चौकशी केली असता समजले की , त्रिशूलचे रायसिंग सोगा पाडवी व गिरजाबाई रायसिंग पाडवी यांचं नरेंद्र नांवाचं एक वर्षे वयाचं बाळ देखील पुरात वाहून मृत्यू पावलं थोरात यांनी त्यांचे सांत्वन करीत त्यांना देखील जीवनावश्यक वस्तू दिल्या त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतली व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करील असे सांगितले पूरग्रस्तांना साहित्य मदत वितरणासाठी शिवसेना अक्कलकुवा विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे,तालुकाप्रमुख महेश पाडवी,उपतालुकाप्रमुख दिलीप पाडवी,तालुका युवाअधिकारी मुकेश वळवी,पिंटू वळवी, कांतीलाल वळवी,अनिल पराडके,शहरसंघटक अजय भावसार,गणप्रमुख भिका पाडवी,मानसिंग पावरा रणजित चव्हाण,रिजवान शेख,चंदू पटले, राया पटले मानसिंग वळवी, वनसिंग तडवी,जोब्या पावरा, मांगा पावरा,ज्योती बोलसे, अर्चना राऊत व शिवसैनिक बंटी सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!