भूषण गरुड, पुणे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी मताकडे लक्ष ठेवून नका त्यापेक्षा मतदार राजाच्या मनावर लक्ष ठेवा; खासदार गिरीश बापट
बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन तोडफोड, महिलां व मुलींचे विनयभंग, चोरी, या व अशा प्रकारच्या घटना बिबवेवाडी परिसरात होवू नयेत याकरिता बिबवेवाडी पोलिसांच्या ‘सीसीटीव्ही वॉच प्रोजेक्टच्या’ उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ३७ च्या नगरसेविका रुपालीताई धाडवे यांच्या वार्डस्तरीय निधीतून ३७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्यांचा लोकार्पण सोहळाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे पुणे शहर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
बिबवेवाडी प्रभाग क्रमांक ३७ च्या नगरसेविका रूपालीताई धाडवे यांच्या वार्डस्तरीय निधीतून ३२ सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून १०० टक्के जनता भयमुक्त होणार तसेच प्रभागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी, बिबवेवाडी पोलिसांनी ‘सीसीटीव्ही वॉच प्रोजेक्ट’ या उपक्रमांतर्गता नुसार वेळोवेळी लोकप्रतिनिधी व दुकानदारांचे मार्गदर्शन करून लोकप्रतिनिधीनी त्यांच्या प्रभागात व परिसरातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेरील बाजूस हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले. यामुळे संबंधित बिबवेवाडी प्रभागात व दुकानाच्या भागामध्ये २४ तास लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी ८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, ते सर्व एकमेकांशी जीपीएस टॅगने जोडले गेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्थाननिश्चितीही करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर पोलिस लगेचच त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पाहू शकतो. या कॅमेऱ्यांमुळे मोबाईल चोरी, विनयभंग, गंभीर स्वरूपातील गुन्हे रोखणे पोलिसांना शक्य होणार आहेत. असे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर म्हणाले की चोरी, दरोडे, गळ्यातील चेन हिसकावणे या स्वरुपाच्या सुमारे ६३ गुन्ह्यांचा पुणे पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साह्याने छडा लावला आहे. या प्रकरणी ७७ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या २९ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले. ‘सीसीटीव्ही वॉच प्रोजेक्ट’ या उपक्रमांतर्गत दुकानदारांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे या आरोपींविरोधात पोलिसांना सबळ पुरावेच मिळाले आहेत. सीसीटीव्ही वॉच उपक्रमामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले. त्याचबरोबर पोलिसांकडे संबंधित आरोपीं विरोधात पुरावे मिळणे शक्य झाले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आम्ही आतापर्यंत ६३ गुन्ह्यांचा शोध लावला असून, ७७ जणांना अटक केली आहे. गेल्या ३ ते ४ महिन्यांत चोरट्यांकडून तब्बल ६२,७४,००० रुपयांचा ऐवज आम्ही हस्तगत केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करते वेळी सांगितलेकी पुणे शहराच सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची मागणी अनेक वर्षांपासून विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात करण्यात येत होती. आमच्या सरकारने संपूर्ण पुणे शहरात २९ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची अंमलबजावणी केली, तसेच पुणे शहराचा विस्तार लक्षात घेता या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर पुणे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे, शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यास मदत होणार असल्याचेही खासदार गिरीश बापट यावेळी स्पष्ट केले. जागतिक दर्जा व उच्चक्षमतेच्या सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने बिबवेवाडीतील प्रभाग क्रमांक ३७ ची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत होणार असून, वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होईल, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक आमदारांनी माताकडे लक्ष ठेवून नका त्यापेक्षा मतदाराच्या मनावर लक्ष ठेवा मतदार राजाची कामे करावेतजेणेकरून ते तुम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील. खासदार गिरीश बापट यांनी निवडणुकीत कधीही पैसा खर्च केला नाही. त्यापेक्षा त्यांनी मतदार राजाची कामे करत प्रेमाने मन जिंकत नगरसेवक पद, आमदार पद, पालकमंत्रीपद व आत्ता खासदारकी भूषवित आहे. असे गुपित सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळाचे प्रमुख पाहुणे पुणे शहर खासदार गिरीश बापट, पूणे महानगर पालिकेचे सभागृहनेता श्रीनाथ भीमाले, मा. बिबवेवाडी प्रभाग क्रमांक ३७ चे नगरसेवक दिनेश धाडवे, बिबवेवाडी प्रभाग क्रमांक ३७ च्या नगरसेविका रूपालीताई धाडवे, पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कलगुटकर वानवडी विभाग, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण आडके, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, बिबवेवाडी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व प्रामुख्याने मोठ्या संख्येने महिला, जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष हरीशजी परदेशी यांनी केले.