Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेनवीन वर्षाची हिमेश रेशमिया कडून प्रेक्षकांसाठी अनमोल भेट "हॅप्पी हार्डी अँड हिर"

नवीन वर्षाची हिमेश रेशमिया कडून प्रेक्षकांसाठी अनमोल भेट “हॅप्पी हार्डी अँड हिर”

गणेश जाधव, पुणे

बॉलिवूडमध्ये आत्ता नवीन वर्षाची सुरुवात म्युझिकल पद्धतीने होणार आहे कारण गायक ,संगीत ,दिग्दर्शक, अभिनेता ,रॉकस्टार हिमेश रेशमिया याचा आगामी हिंदी चित्रपट “हॅप्पी हार्डी अँड हिर ” येत्या 3 जानेवारी ला प्रदर्शित होणार आहे .
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता ,रॉकस्टार हिमेशने पुण्यात येऊन पुणेकरांची मने जिंकली, पुणेकरांनी देखील हिमेशचे दणक्यात स्वागत करून त्याला आणि त्याच्या सिनेमाला भरपूर शुभेच्छा दिल्या.
म्युझिकल फिल्म ऑफ द इयर ठरणाऱ्या “हॅपी हर्डी अँड हीर” सिनेमात हॅप्पी, हार्डी ,हीर अशी हृदयाने भारतीय असलेली तीन पात्र आहेत त्यांची लव्हस्टोरी आणि खऱ्या प्रेमाची जर्नी म्हणजे आहे हा सिनेमा ..

या सिनेमात हिमेश रेशमिया डबल रोलच्या भूमिकेत दिसणार आहे आणि कथेसाठी उत्तम संगीत, मधुर गाणी देखील तयार करण्यात आली आहेत.

हिमेश रेशमिया आणि अभिनेत्री सोनिया मन यांची जोडी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे .”तेरी मेरी कहानी” आणि “आशिकी मे तेरी “ही दोन गाणी ब्लॉकबस्टर हिट झाली आहेत .
अक्षरशा प्रेक्षकांनी या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
“हॅप्पी हार्डी अँड हिर “या सिनेमात देखील एकापेक्षा एक उत्तम गाणी आहेत आणि ती उत्तम पद्धतीने प्रदर्शित झाली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम योजना केली गेली पाहिजे असा विचार हिमेश रेशमिया तसेच चित्रपटाच्या निर्मात्या दीपशिखा देशमुख आणि सबिता मानकचंद आणि म्युझिक लेबल कंपनी टिप्स यांनी केला आहे . भारतातील बारा शहरांमध्ये प्रमोशनल कॉन्सर्ट आयोजित करण्याचा आणि त्यांची सुरुवात पुण्यापासून करायची याविषयी आपले मत आणि उत्सुकता मांडताना हिमेश रेशमिया म्हणाले की “हॅपी हर्डी अँड हीर “सिटी टूरसाठी मी खूप उत्सुक आहे. मला वाटत नाही की यापूर्वी अशा प्रकारची प्रमोशनल स्ट्रॅटेजी करण्यात आली असावी आणि हे फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंबा यामुळे शक्य झाले आहे.

ज्यांनी ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमातील संगीताला लोकप्रिय केले आणि मनापासून दाद दिली ,सिनेमाच्या संगीताला मिळालेल्या यशाच्या प्रवासात ट्रेलर प्रदर्शित करण्याची देखील पहिलीच वेळ आहे .

जेव्हा जेव्हा मी पुण्यात गाण्याचे कार्यक्रम केले तेव्हा तेव्हा या शहराने मला खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि मला खात्री आहे की पुण्यात होणारी” हॅपी हर्डी अँड हीर” ची प्रमोशनल कॉन्सर्ट पूर्वीपेक्षा जास्त प्रेम प्रतिसाद देईल ,जो माझ्यासाठी एक अनमोल अनुभव ठरेल. प्रेक्षकांनी माझ्या या या सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी प्रतीक्षा केली, उत्सुकता दाखवली याचा मी मनापासून आभारी आहे आणि पुण्यासह भारतातील इतर शहरात होणाऱ्या कॉन्सर्टसाठी मी आतुर आहे या सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.या सिनेमाचे चित्रीकरण यूकेमधील सुंदर ठिकाणी झाले आहे .दीपशिखा देशमुख आणि सबिता मानकचंद दिग्दर्शित या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी राका यांनी केली असून ३जानेवारी २०२०रोजी हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध प्रदर्शित होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!