व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात

1158

आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघास पश्चिम बंगाल संघाकडून १८-२५, १०-२५, १४-२५ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशाही संपुष्टात आल्या.
    या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना उंचीचा फायदा घेता आला नाही. तसेच बचावात्मक तंत्र व सांघिक समन्वय यामध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या चुका पश्चिम बंगालच्या पथ्यावर पडल्या. त्या तुलनेत बंगालच्या खेळाडूंनी जोरदार स्मॅशिंग व अचूक प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. त्यांचा सांघिक समन्वयही कौतुकास्पद होता.