धनवडे कुटुंबाने केले मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत…

2284

पुणे प्रतिनिधी,

मुलगी म्हणजे लक्ष्मी…पहिली बेटी धनाची पेटी.. हेच ब्रीदवाक्य मानून दिपक धनवडे व त्यांच्या कुटुंबाने केले मुलीचे जन्माचे अनोखे स्वागत…
पहिली बेटी धनाची पेटी..असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते. मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. दुसरीकडे हैदराबाद, कोपर्डी येथे घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात. मात्र, उंडरी वडाची वाडी येथील प्रगतीशिल शेतकरी धनावडे कुटुंबाने फुलाच्या पायघड्या टाकत मुलीचे जन्माचे स्वागत केल्याने सर्वत्र या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.

मुलगी ही परक्याचे धन असते म्हणून ‘मुलगी नको’ अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे. मात्र, धनवडे कुटुंबाने मुलीचे अनोखे स्वागत केले आहे आईचे व लेकीचे घरामध्ये प्रवेश करताना दोघीनाही औक्षण करत ओवाळून फुलाच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात मध्ये स्वागत केले. शेतकरी असलेल्या धनवडे कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल .जसं देविच स्वागत धुमधडाक्यात करतात तसंच जन्माला येणाऱ्या लेकीच स्वागत सुध्दा त्यांनी धुमधडाक्यात केलं आहे.