लेखिका अमिता लोणकर यांचा सुंदर लेख
जे आपल्याकडे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आनंद शोधला तर हाती खूप काही गवसतं समुद्रातल्या शिंपल्यातल्या मोत्यासारखा सुरेख,सुंदर असंच काहीसं दुसऱ्याकडे जे आहे त्यापेक्षा माझ्याकडे असं माझं काय आहे स्वतःच याचा कधीतरी विचार करतो का आपण?
फुलांच्या सड्यासारखं मुक्त उधळून टाकायचं स्वतःमधील चांगुलपणाला,मग कुणी त्या चांगुलपणाची फुलं पायाखाली तुडवली तर वाईट नाही वाटून घ्यायचं ,कोणी परडीत भरून घेतं, कोणी देवाच्या पूजेसाठी पण, दोन्हीपैकी काहीही मिळतं म्हणून का फुलं सडा पाडायचं थांबत असतं? झाड बहरायच थांबत असतं,?मग आपणही असंच व्हायचं, सूर्यासारखे तळपता नाही आलं म्हणून काय झालं चंद्राची शीतलता होऊन राहायचं ,अगणित चांदण्यातही चंद्रासारखं खुलायच, अन कलेकलेने स्वतःमधील गुण वाढवायचे ,पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होण्यासाठी अमावस्या आली कि झाकून जायचं आणि पुन्हा कलेकलेने वाढायचं
तसंच जीवनात दुःख संकट आली तरी शांत राहून त्याला सामोरं जायचं,अन् पुन्हा पुन्हा कलेकलेने आपल्यातले गुण वाढवायचे,निसर्गाच्या मुक्त उधळण प्रमाणे ,इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे जीवनाच्या आकाशात रंगीत होऊन राहायचं आपल्या प्रसन्न,हसर्या, आत्मविश्वासाने भरलेल्या चेहर्याकडे बघून कुणाला तरी नक्कीच सुखवायचं*
दुःख आणि प्रॉब्लेम काय हो कुणाला नसतात!पण त्यातही आनंदी कसं राहायचं हे आपलं आपणच ठरवून जीवनाला नववधूसारखा नटवायचं,सजवायचं कारण त्यातूनच पुढे जीवनाची नवीन सुरुवात होणार असते मग आपल्या (Positiv) सकारात्मकतेपुढे, हास्यापुढे आनंदी राहण्यावर* *परमेश्वर ही खुश होऊन म्हणत असतो याची कितीही परीक्षा घ्या हा/ही नेहमीच आनंदित राहतो/राहते मी याची/हिची निर्मिती केली आहे हे पाहुन तो पण गालातल्या गालात हसत असतो, सुखावत असतो
लेखिका :अमिता भिलारे लोणकर , कोंढवा खुर्द
*9657855416*