अखेर गणरायाला खड्डयांतूनच निरोप ; शिवनेरीनगर नागरिकांचा संताप

873

कोंढवा प्रतिनिधी

कोंढवा खुर्द गावठाण ते शिवनेरीनगरला जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका फक्त नागरिकांकाडून टॅक्स वसूल करत आहे, परंतु नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी आणि कर्माचारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
शिवनेरी हा भाग कायम समस्यांच्या गर्ग्रेत राहिला आहे. पूर्वी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. आता थोड्या प्रमाणात तो प्रश्न सुटला आहे, येथील पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दिलीप लोणकर यांनी या भागात पाण्याचे योग्य नियोज केल्याने आज शिवनेरी नगरचा पाणीप्रश्न काही प्रमाणात तरी कमी झाला असे येथील स्थानिक नागरिक सांगतात .
या वार्डात अनेक आजी -माजी नगरसेवक होऊन गेले त्यांनी देखील त्यांच्या परीने या भागात सुविधा निर्माण केल्या. परंतु लोकवस्ती वाढल्याने नागरिकांना सुविधा द्यायच्या झाल्यास मोठमोठी ड्रेनेज लाईनची कामे सुरु झाली त्यामुळे खोदकाम केल्यामुळे रस्त्यांची पूर्ण वाट लागली. सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले.
येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने काही वर्षांपूर्वी, कोंढव्याच्या विकास आम्ही हिंदी चित्रपट सुष्टीतील आघाडीची अभिनेत्रीच्या गालासारखा करू आश्वासन देखील दिले होते. शिवनेरी नगर , कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत यामुळे दुचाकीवरील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील समस्यांच्या विरोधात शिवसेनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात छोटे मोठे बोर्ड लावले असून यावर पालिका अधिकारी कधी दुरुस्थी होईल याची नागरिक वाट पाहत आहेत. यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रसाद बाबर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, शिवनेरीनगर सह संपूर्ण कोंढवा परिसरात असंख्य समस्यां असून चांगले रस्ते, लाईट , पाणी नागरिकांना कधी उपलब्ध होणार याचा जाब आम्ही पालिका प्रशासनास विचारत आहोत. स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याशी आम्ही संपर्क केला असता ते म्हणाले कोंढवा परिसरातील समस्यांबाबत आम्ही पालिकेच्या संबधित विभागाला कळविले असून त्यांनी लवकरात कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने त्यांना आम्ही धडा शिकवू. याबाबत माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, आम्ही पालिकेला कळविले असून अधिकाऱ्यानी लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते सागर लोणकर यांनी जर लवकरात येथील खड्डे बुजविले नाहीतर , मोठे जनआंदोलन करू असा इशारा दिला आहे .
याबाबत मा नगरसेवक तानाजी लोणकर म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले असून अधिकाऱ्यानी पाऊस संपल्यावर रस्त्यांची कामे सुरू करू असे आश्वासन दिले आहे.
वास्तविक गणेश विसर्जनापूर्वी येथील रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त झाले पाहिजे होते, परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या उदासीनतेमुळे येथील समस्यां जशा आहे तशाच राहिल्या आहेत. शिवनेरी नगरचा विकास नियोजन बद्ध करून पालिका प्रशासन , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय नेते यांनी एकत्रित येऊन याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी हवी प्रचंड इच्छाशक्ती…