नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

602

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठी होणाऱ्या पैसे,वस्तू आणि दारुच्या वाहतूकीला आळा घालण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला पोलीस अधिक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,उप अधिक्षक रमेश पवार आदी उपस्थित होते.
श्री.मंजुळे म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करण्यासाठी चेक पोस्ट सुरू करण्यात यावे. अवैध दारुच्या वाहतुक रोखण्यासाठी नाकाबंदी करावी.निवडणुक कालावधीत जिल्ह्यात शांततेचे वातावरण राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत मतदान आणि मतमोजणीच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्ताबाबत आढावा घेण्यात आला.