आळंदी बाह्यवळणावर वृक्ष संवर्धन मोहीमेस प्रारंभ

370

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी शहर व पंचक्रोशीतील गावांची स्वच्छता केवळ ग्रामपंचायत, आणि नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरीकाचीही असल्याने नागरिकांनी आपापला घर परिसर, गाव, शहर स्वच्छ तसेच हरित ठेवण्यासाठी आळंदी नगरपरिषद माझी वसुंधरा २.० अंतर्गत आळंदी नगरपरिषद, श्री साई कन्सल्टन्सी अँड चँरीटेबल ट्रस्ट, आळंदी जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील विविध सेवाभावी संस्था व कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्यातून शहरात जनजागृती व स्वच्छता अभियान राबविले जात आहे.या नातंर्गत आळंदी बाह्यवळणावर वृक्ष संवर्धन मोहीमेस प्रारंभ करण्यात आला.
या अभियानाचा भाग म्हणून आळंदी बाह्यवळण मार्गावर स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत आळंदी बाह्यवळणावर लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन साठी मोहीमे सुरु करण्यात आली आहे. यात लावण्यात आलेल्या रोपांचे जतन व्हावे यासाठी वाढता उन्हाळा लक्षांत घेऊन सर्व परिसरातील झाडांना टँकरने पाणी आणून देण्यात आल्याचे श्री साई कन्सल्टन्सी अँड चँरीटेबल ट्रस्टचे वतीने शुभम पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आळंदी स्वच्छता जनजागृती अभियानचे समन्वयक आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी नागरपरिषदे विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, व्यापारी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष माऊली गुळुंजकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, बालाजी नागरगोजे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी वृक्षांना पाणी देत सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशीच स्वच्छता मोहीम यापुढेही सुरु रहाणार असल्याचे शुभम पाटील यांनी सांगितले. बाह्य वळण मार्गावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी औद्योगिक वसाहतीतील मे. डायनॅक्सेल इंजिनियर्स प्रा.ली. मरकळ चे संचालक संदिप देवरे यांचे वतीने एच.आर मॅनेजर सुहास चौगुले यांनी सामाजिक बांधिलकीतून या परिसरात वृक्ष लावण्यास वृक्षरोपे उपलब्द्ध करून दिल्या बद्दल अर्जुन मेदनकर यांनी कंपनीच्या कार्याचे कौतुक केले.
बाह्यवळण मार्गावर करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेतील वृक्षांना पाणी देऊन वृक्ष संवर्धन उपक्रम राबविण्यात आला.
या स्वच्छतेच्या उपक्रमात येथील केळगाव ग्रामपंचायत, च-होली ग्रामपंचायत व आळंदी नगरपरिषद माझी वसुंधरा स्वच्छता अभियान अंतर्गत आळंदी स्वच्छता जनजागृती मोहीम अभियान विविध सेवाभावी संस्था यांचे सहकार्याने राबविण्यात येत असल्याचे समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,केळगावच्या सरपंच गुंफाबाई ठाकर, ग्रामसेवक भारती म्हेत्रे , चऱ्होलीचे ग्रामसेवक जे. पी. जगदाळे, सरपंच स्वप्नाली पगडे यांचेसह विविध सेवाभावी संस्था व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रत्येक्ष स्वच्छतेच्या कामात हातभार लागत असल्याने स्वच्छता अधिक प्रभावी होण्यास मदत झाल्याचे अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
आळंदी चाकण रोड, बाह्यवळण मार्गावर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन व स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी आळंदी स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर, महा. राज्य यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णु कुर्‍हाडे,उपाध्यक्ष भागवत काटकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, ज्ञानाई ग्रुपचे हरिभाऊ कुऱ्हाडे, शुभम पाटील, बाळासाहेब कवळासे, सिध्देश्वर सलगर, योगेश धोतरे, माऊली बुधवंत, एकनाथ मस्के, नवनाथ गयाळ, गणेश गलांडे, गणेश काळे, अशोक गरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.