गायकवाड यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे हस्ते प्रदान

314

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भोसरी येथील साहित्यिक दत्तात्रय पांडुरंग गायकवाड महाराज यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा सन २०१९ या वर्षीचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार यात २५ हजार रक्कमेचा धनादेश, शाल, स्मृतिचिन्ह, श्रम कल्याण युग मासिकाचे प्रकाशन प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्य मंत्री बच्चू कडू, यांचे हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात झाला. या प्रसंगी कामगार विभाग प्रधान सचिव विनिता वेड सिंगल, विकास आयुक्त ( असंघटित कामगार) डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कामगारांचे कार्याचा उल्लेख करीत मार्गदर्शन करताना हसन मुश्रीफ म्हणाले, कामगार हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. असंघटित कामगारांचे हितासाठी महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असे सांगितले. राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, जीडीपी हा मालकांमुळे न वाढत कामगारांचे कामामुळे वाढतो आहे. कारखान्यांनी कामगारांचे श्रमाला प्रतिष्ठा द्यावी असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले श्रमावर आधारित योजना निर्माण व्हाव्यात. केंद्रीय कामगार कायद्यामुळे शेतकरी हिताला बादा येणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. यावेळी मंडळाच्या नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. गायकवाड यांचेसह ५१ गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारार्थी यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा सन्मान या पुरस्काराने झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार देऊन हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास गौरविण्यात आले. कामगार भूषण पुरस्कार राजेंद्र वाघ यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळयास कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांचेसह कामगार
पूरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार नेते स्व. नारायण मेघाजी लोखंडे यांचे तैल चित्राचे अनावरण करण्यात आले. प्रतिमा पूजन तसेच अभ्यासिकेचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते झाले. सोहळ्यास राज्यातील गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कुटूंबीयांसह मित्र परिवार उपस्थित होता.
शासनाने कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यासह विशेष दक्षता घेण्यात आल्या. या सोहळ्याचे प्रक्षेपण डिजीटल माध्यमातून देखील थेट करण्यात आले. मुंबई-ठाणे वगळून बाहेर गावाहून आलेल्या पुरस्कारार्थीना मंडळाच्या नियमा नुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देण्यात आला. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, पारितोषिक रक्कमेचा धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला.
साहित्यिक दत्तात्रय पांडुरंग गायकवाड महाराज धार्मिक,कामगार,सामाजिक,क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध धार्मिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांचे कामगार क्षेत्रातील योगदानाचा या पुरस्काराने सन्मान होत आहे. सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील समाज प्रबोधनाचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आळंदी जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण,अन्नदान, धार्मिक ग्रंथांचे प्रकाशन असे त्यांचे कार्य असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. ते दापोडी येथील एस.टी. महामंडळाचे कार्यशाळेत कार्यरत आहेत.