खेड तालुक्यात श्री समर्थ विद्यालय शंभर नंबरी

328

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा च्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी ( ssc ) बोर्ड परीक्षेत चिंबळी फाटा येथील इंग्रजी व सेमी या दोन्ही माध्यमांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आळंदी पंचक्रोशीतून विद्यालयाचे पालक, नागरिक, शालेय वर्तुळातून कौतुक होत आहे.
संस्थेसह प्रशालेच्या वतीने सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विद्याताई गवारे, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे, प्राचार्या अनिता टिळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रशालेत प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी यांच्यात अनुक्रमे इंग्रजी माध्यमात रियाजबीन जमालोउद्दीन शेख (92.80 – प्रथम), निकिता हनुमंत पवार (92.40-द्वितीय) , शुभम राठोड (89.80-तृतीय) यांचा समावेश आहे.
सेमी माध्यमात मधुरा गावडे (94.20 प्रथम), विशाखा बहिरट (90 – द्वितीय), शुभम यजगार (88.80 – तृतीय) यांचा समावेश आहे. या यशात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकवृंद, पर्यवेक्षिका शोभा तांबे, मोनाली मुंगसे, सुनीता नाटक ,रुपाली पवळे, स्नेहल विधाते, ललिता बडदे, रुपाली सपकाळ, वैशाली पटले, रुपाली नाकट, सपना टाकळकर, सुनेत्रा खालोकर, अजित थोरात, रत्नाकर वाघमारे, स्नेहा कडावकर, शिल्पा बुत्कर, मोनिका हिंगे, निखिल कांबळे, सिद्धेश्वर धोंडगे यांनी प्रशालेत परिश्रम घेतले. सर्वांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.