आळंदीत दिव्यांग बांधवांची मोफत नेत्र तपासणी

187

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सक्षम पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदीत दिव्यांग बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५२ दिव्यांग बांधवानी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दिव्यं बांधवांनी या शिबिरात सहभागी होत शिबीर यशस्वी केले.
या शिबिरास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आळंदी कार्यवाह अशीष जोशी, सेवाकार्य प्रमुख सोमनाथ कदम, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते. सक्षम पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भेगडे, सचिव विजय पगडे, पिंपरी चिंचवड महानगर सहसचिव राजेश बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर मुंडे, बाळासाहेब दुबाले, अशोक सोनवणे आदींनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. या शिबिरात ५२ गरजू दिव्यांग सहभागी झाले. त्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी साठी डॉ. जयश्री धायबर स्वतः दिव्यांग असून त्यांनी हा कॅम्प मोफत आयोजित केला. सक्षम सोबत काम करण्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. यावेळी डॉ. धायबर यांनी नेत्रदाना संदर्भात लोकांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन सक्षम संस्थेचे प्रांत सहसचिव गहिनीनाथ नलावडे यांनी केले. सक्षम पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मुरलीधर कचरे, प्रांत सचिव महेश टांगसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी करण्यात आला. यावेळी संत सेना महाराज धर्मशाळा आळंदीचे गणेश भोयटे, परमेश्वर फिरंगे यांनी शिबिरास जागा उपलब्द्ध करून देऊन विशेष सहकार्य केले. सक्षमच्या उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांनी शिबीर यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले.