वेदांत तळेकर हिंदरत्न पुरस्काराने सन्मानित

266

अनिल चौधरी,पुणे

29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतात साजरा करण्यात आला. आणि त्याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अवचित्य साधून रत्नागिरी येथे 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 चे आयोजन केले होते.संपूर्ण भारतातील 32 प्रकारच्या विविध खेळातून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो गेल्या दोन वर्षात वेदांत सदाशिव तळेकर याने स्केटिंग खेळातून उत्कृष्ट व अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल त्याला ‘ हिंदरत्न शेर हिंदुस्तान “हा किताब प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.  
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. एम. देवेंद्र सिंह जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी , सभापती श्री. डी आर. जाधव आणि सभागृह नेते श्री. सुनील पवार सर यांच्या हस्ते वेदांनला हा किताब देण्यात आला. वेदांतने गेल्या अडीच वर्षात जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये 64 पदके, मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत, मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 96, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 48 तास मोस्ट पीपल कम्प्लीट 100 मीटर इन लॅन स्केटर 11.21 सेकंद मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याचे प्रशिक्षकश्री. विजय मलजी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तो सध्या रॉक अँड व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज येथे प्रशिक्षण घेत आहे. तो सध्या नववी मध्ये क्रिसेंट हायस्कूल महर्षी नगर येथे शिकत आहे. आई-वडिलांची मोलाची साथ लाभली आहे. वेदांतच्या या पुरस्काराने पुण्याचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरातील नागरिकांनी आनादौत्सव साजरा केला.