“अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये…

68

“विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा – प्रमोद नाना भानगिरे...

अनिल चौधरी, पुणे

अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हडपसर मतदार संघात एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात आणला, या निधीतून डीपी रस्ते व अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत विकासकामांमधून हडपसर परिसर व महंमदवाडी परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे, न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा असा इशारा शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला.
राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी महंमदवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक भूमिका भानगिरे यांनी मांडली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल घुले,
उपशहर प्रमुख संतोष रजपूत, विकी माने, विभागप्रमुख अभिमनू भानगिरे, महिला उपशहरप्रमुख स्मिता साबळे, जहीर भाई, सविता सोलंखे आदी यावेळी उपस्थित होते.

हडपसर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर मधील तीन उड्डाणपुल पाडून फातिमानगर पासून एकच मोठा उड्डाणपूल व्हावा व मेट्रोचे काम लवकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले आहे, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे सांगून प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले मुंढवा, केशवनगर, मांजरी या भागातील अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. फुटबॉल मैदान, तसेच शासनाच्या जागेत क्रिकेट प्रेमींसाठीही मोठे मैदान करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, हडपसर महंमदवाडी परिसरातील डीपी रस्ते व्हावेत यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डीपी रस्त्यांसाठी 122 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हडपसर मधील वाढती गुन्हेगारी व पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता येथे आणखी दोन पोलीस स्टेशन व्हावेत म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, हडपसर विधानसभा मतदारसंघात नगरसेवक नसताना महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत आम्ही कामे करतो दुसरे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात अडीच वर्षे त्यांचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला एकही रुपया आणता आला नाही आणि आता आम्ही कामे करतोय तर त्याचे श्रेय घेता अशा विरोधकांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी भानगिरे यांनी दिला. निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत देऊन विरोधकांवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील व ते निवडूनही येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली तर दहा वर्षात हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असा दावाही नाना भानगिरे यांनी केला आहे.

“माजी नगरसेवक असताना विकास कामांचा डोंगर…
हडपसरमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खासदार, आमदार अपयशी ठरले असताना शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी माजी नगरसेवक असताना देखील मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची कामे केली आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी भानगिरे यांच्या माध्यमातून मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, भानगिरे यांच्या कार्यालयात जनता दरबार भरतो व तेथे नागरिकांची कामे कोणतीही कारणे न देता तातडीने सोडविली जातात.