विमाननगर प्रतिनिधी
सर्व्ह नंबर 207 फिनिक्स मॉल शेजारी आय लव यू विमान नगर पॉईंटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखना ,रुबाबदार आणि अभिमान वाटावे असे स्मारक व खुले ग्रंथालय करण्याच्या मागणीबाबत..
बहुजनांची अस्मिता जपण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देखणी ,रुबाबदार आणि अभिमान वाटणारे असे भव्यदिव्य स्मारक व खुले ग्रंथालय विमान नगर येथे उभारण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत.
विमान नगर व आजूबाजूचे परिसर खराडी-चंदननगर,वडगावशेरी परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही आपणास निदर्शनास आणून देणारी जागा सर्वे नंबर 207 फिनिक्स मॉल शेजारी जिथे “आय लव यू विमान नगर” हा पॉईंट आहे त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व फुले ग्रंथालय स्थापन करण्यात यावे ह्यासाठी पुणे महानगरपालिकेने त्या जागेचा वापर करावा. कारण सध्याच्या अमेनिटी स्पेस चा कोणताही वापर होत नाही त्या ठिकाणी बहुजनांचे अस्मितेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व खुले ग्रंथालय झाले तर सदर जागेचा योग्य वापर होईल व विमान नगर च्या बहुजनांसाठी एक आपुलकी चे स्थान किंवा ठिकाण उपलब्ध होईल जिथे खुले ग्रंथालय असेल अशा मागणीचा आयुक्तकडून विचार केला जावा. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर सदर स्मारकासाठी लागणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा खर्च हा आम्ही आमच्या युग परिवर्तन सोशल फाउंडेशन मार्फत करू व इतर विकसन खर्च आपल्याकडून करण्यात यावा. ही मागणी मागणी करत आहोत.
सादर मागणीचे 3 डी प्रजेन्स्टेशन आम्ही बनवले असून सादर सीडी व फोटो पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली. त्यावर पुणे मनपा आयुक्त यांनी यावर विचार करून तसा ठराव मांडू असे आश्वासन दिले.