डावीकडून संतोष बारणे, आ. महेश दादा लांडगे, अभिनेता सुबोध भावे, सोमनाथ सस्ते आणि किरण सावंत
अनिल चौधरी, पुणे :-पिंपरी – चिंचवड मोशी येथील प्रसिद्ध असलेल्या ‘सिल्वर’ समोहाच्या कार्यालयाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे,अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे आणि आ. महेश दादा लांडगे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. या सोहळ्याला ‘सिल्वर समोहाचे चेरमन किरण सावंत, संतोष बारणे, सोमनाथ सस्ते, विकास साने त्याच बरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती. या प्रसंगी बोलताना अभिनेता सुबोध भावे म्हणाले, की “मोशीमध्ये एवढ्या छान आणि सुसज्यपणे उभारलेले ‘सिल्वर समोहाचे कार्यालय प्रशस्त आणि सकारात्मक उर्जा देणारे आहे. या ठिकाणी खेळती हवा, भरपूर सूर्य प्रकाश आणि आल्हादायक वातावरण मनाला आणि अंतरमनाला आत्मिक समाधान देणारे आहे. या ठिकाणी येवून मला खूपच छान वाटले आणि मराठी माणसांनी एकत्र येवून उभारलेले वैभव पाहून माझा उर भरून आला.
यावेळी या ‘सिल्वर समोहाचे चेरमन किरण सावंत, संतोष बारणे, सोमनाथ सस्ते, विकास साने यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी आमचे हे कार्यालय असून या कार्यालयातून ग्राहकांना सर्वोतम सेवा देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. तसेच या भागातील स्वतःच्या हक्काच घर घेण्यासाठी सिल्वर समोह एक उत्तम पर्याय आहे.