शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुण्याात व्हर्चुअल क्लासरूम स्टुडिओचे उद्घाटन

560

प्रतिभा चौधरी, पुणे

शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)च्या संकुलात उभारण्यात आलेल्या स्टुडिओचे उद्घाटन केले. या स्टुडिओच्या माध्यमातून नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील शैक्षणिकदृष्ट्या मागास विभागातील तब्बल ३६ शाळांमध्ये आरएमएसए (समग्र शिक्षा) या प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित होणार असून त्याद्वारे ‘व्हर्चुअल क्लासरूम’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘व्हॅल्युएबल ग्रुप’ हा व्हीसॅटआधारित संवादरुपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणार आली आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री शेलार म्हणाले की, शहरी परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे, ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यातील पुढचे पाऊल हे व्हर्च्युअल क्लासरूम या प्रकल्पाच्या माध्यमातून टाकण्यात आले आहे. व्हर्च्युअल क्लासरूम स्टुडिओच्या माध्यमातून 9 जिल्ह्यातील 36 शाळांमधील विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांशी थेट संवाद साधता येणार आहे. सध्याच्या अभ्यासक्रमाचे काही विषयांचे धडे हे व्यक्तिमत्त्वांवर, स्वातंत्र सैनिकांवर तसेच इतिहासातील महान व्यक्तींवर आहेत. या विषयावर प्रावीण्य असलेल्या तज्ञ व्यक्ती, कथाकार किंवा इतिहासकार यांना स्टुडिओत बोलावून व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना हा विषय समजावून देण्यासाठी व विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे
समान आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. ही बाब लक्षात घेऊन आरएमएसए (समग्र शिक्षा), एमएससीआरटी आणि व्हॅल्युएबल ग्रुप यांनी संयुक्तपणे पुणे येथे १२ ऑगस्ट २०१९ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा आहे आणि त्या माध्यमातून या चार जिल्ह्यांमधील शिक्षणात दर्जा वाढण्यास कशी मदत होईल, ही बाब अधोरेखित करण्या त आली.
पुणे आणि आसपासच्या भागातील तज्ञ शिक्षक हे या स्टुडिओच्या माध्यमातून दैनंदिन पातळीवर इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांसारखे विषय दुर्गम भागातील शाळांमधील ९ वी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. व्हर्च्युअल इंटरॅक्शन प्रोग्राम हा प्रकल्प उपग्रहाचा वापर करून उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून राबविला जातो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना शिकवतात.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा तसेच एमएससीइआरटी आणि ‘आरएमएसए’चे अधिकारी उपस्थित होते.
‘इनोव्हेशन फंड फॉर सेकंडरी स्कूल’ या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आदीवासीबहुल पालघर, नंदुरबार, नाशिक व गडचिरोली या जिल्ह्यांमधील माध्यमिक शाळांमध्ये ‘व्हर्चुअल क्लासरूम’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ३६ शाळांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पुण्यारच्याआ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) येथे स्टुडिओ उभारण्यात आला आहे. ‘क्लासरूम लर्निंग’मध्ये विद्यार्थ्यांना काही विषयांच्या संकल्पना कठीण वाटतात. त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) ही तज्ञ शिक्षकांच्या मदतीने वर्गनिहाय नियोजन करत ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून या शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या उपक्रमाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून विषयनिहाय शिक्षकांनी स्वतः ‘व्हर्चुअल क्लासरूम’द्वारे वर्ग घेणे अपेक्षित आहे. यासाठी पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील माध्यमिक शाळांमधील अनुभवी व अभ्यासू शिक्षकांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. हे शिक्षक स्वयंप्रेरणेने विनामानधन हे काम करतात. त्यासाठी त्यांना वर्षअखेरीस राज्यस्तरावरून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. या उपक्रमाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असून हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून राबविला जात आहे.
या कार्यक्रमाचा मूळ हेतू हा शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हा आहे. त्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांशीसुद्धा संवाद साधला जातो. हा उद्देश केवळ तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. त्यासाठी व्हॅल्युएबल ग्रुप महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
व्हॅल्युएबल ग्रुपने इतर अनेक राज्यांप्रमाणेच ओडिशा येथील सुंदरगड येथेही ‘व्हर्च्युअल क्लासरूम सोल्युशन’ स्थापन केले असून त्या माध्यमातून दुर्गम भागातील ७० शाळांशी एका स्टुडिओच्या माध्यमातून संपर्क स्थापित केला जातो. या स्टुडिओच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या क्लासरूमद्वारे अत्यंत दुर्गम अशा भौगोलिक भागात असलेल्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी व्हीसॅट सोल्युशनचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. तज्ञ शिक्षक या स्टुडिओचा वापर करून नियमितपणे शालेय अभ्यासक्रमाला अनुसरून सत्रांचे आयोजन करतात. त्यात या मागास राज्यातील ७० शाळा सहभागी होतात आणि संवादही साधतात. व्हॅल्यूएबल ग्रुप हा तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. या समुहाने शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजन या क्षेत्रात असे अनेक उपक्रम दाखल केले आहेत.
00000