जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची मुलाखत

653

मुंबई मंत्रालय, प्रतिनिधी

: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कामगारमंत्री डॉ.संजय कुटे यांची ‘कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाकरिता’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बांधकाम क्षेत्रातील (इमारत व इतर बांधकाम) नोंदणीकृत कामगारांच्या कल्याणासाठी शासन स्तरावर घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे बळकटीकरण, राज्यातील कंत्राटी व संघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सुरू असलेले उपक्रम व योजना, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नव्याने सुरू केलेला विभाग व योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, बारा बलुतेदार यांच्याकरिता सुरू करण्यात आलेली योजना आदी विषयांची माहिती डॉ. कुटे यांनी ‘जय महाराष्ट्र ‘ कार्यक्रमातून दिली आहे.