खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

730

मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊत यांच्या अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर जलील परकार यांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर पुढील दोन दिवस उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात  ठेवण्यात आलं आहे. दरम्यान काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.