संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून अपघात; दोन जणांचा मृत्यू

693

पुणे प्रतिनिधी,

श्री क्षेत्र पंढरपूरहुन आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये जेसीबी घुसून झालेल्या अपघातात दोन वारकरी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात घडली. त्यामध्ये नामदेव महाराजांचे 17 वे वंशज यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 श्री नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरून आळंदीला जात असताना दिवेघाटात एक जेसीबी दिंडीत घुसून भीषण अपघात झाला. त्यामुळे नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36) आणि अतुल महाराज आळशी (वय 24) या दोघांचा  जागीच मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण अत्यवस्थ आहे.