पुण्याच्या श्रुतिका राऊत हिला कझाकिस्तान येथे कांस्य पदक

1346

पुणे प्रतिनिधी,

कझाकिस्तानातील अलमाटी येथे नुकत्याच झालेल्या एशियन क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या कु.श्रुतिका अभय राऊत (वय २४) हिने कांस्य पद्क मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे.तसेच तिने यापूर्वी केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.तिच्या यशाचे कुटुंबिय व नागरिक, मित्रपरिवार  यांनी कौतुक केले असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.