पत्रकार आणि डॉकटर यांना रोखल्यास कारवाई करणार; माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

946

पुणे प्रतिनिधी,

भारतामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असून यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांचा लॉक आऊट जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. तसेच मोदींनी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरीही नागररिक घराबाहेर पडत असल्याने पोलिसांनी घराबाहेर दिसणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फ़िरणाऱ्याना लाठीचा प्रसाद देत आहेत. तर सरकारने काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्याना यातून वगळण्यात आले आहे, परंतु असे असले तरी काही वेळेस अत्यावश्यक सेवे मध्ये असणारे पत्रकार, डॉकटर, परिचारिका, ब्रदर तसेच अन्य सेवा देणाऱ्याना नकळतपणे पोलिसांचा लाठीमार मिळत असल्याच्या तक्रारी येत असल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार आणि डॉकटर यांना त्यांच्या सेवा कार्यापासून रोखू नये तसेच त्यांना रस्त्यांवर अडवू नये अन्यथा रोखणाऱ्यांवर  कारवाई केली जाईल असा ईशारा त्यांनी दिला आहे.

 वास्तविक लॉक डाऊन असल्याने नागरिक घरांमध्ये आहेत अशा वेळी त्यांना माहिती देण्याचे काम पत्रकार मंडळी आपला जीव धोक्यात घालून वृत्तांकन करत आहेत.त्यामुळे लोकांना घरबसल्या बाहेर काय सुरू आहे याची माहिती होत आहे , अशा वेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना वृत्तांकन करताना रोखल्यास लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकणार नाही.कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणाऱ्यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.