कोरोना सॅम्पल तपासणी होणार जलदगतीने

599

पुणे दि.21 : – सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणाची विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.
या उपकरणामुळे पीपीई किटसचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल टेस्टींग घेता येतील. अशी माहिती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत येमुल यांनी दिली.
यावेळी पाहणी करताना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. हे उपकरण निश्चितच उपयोगी राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.
0 0 0 0