ऐन पावसाळ्यात आपत्ती काळात प्रत्येकाने सज्ज असणे गरजेचे ; प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार

597

जुनेद तांबोळी,महाड

महाड महसूल विभागाच्या वतीने आज आपत्ती व्यवस्थापन बाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांनी आपत्कालीन स्थितीत सज्ज असणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या सूचना प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिल्या. या बैठकीस तहसीलदार चंद्रसेन पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, महाड शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप हे उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी रस्त्याबाबत विभागाने घेतलेल्या उपाययोजना आणि तयारी याबाबत माहिती दिली. यावेळी तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी महामार्ग आणि राज्य मार्गावरील दिशादर्शक फलक, पुलांवरील वीज व्यवस्था, सुरळीत करण्यात यावे असे स्पष्ट केले. लाडवली येथील पुलाचे काम सूरु असून या पुलावर ठेवण्यात आलेल्या वाळू आणि मातीमुळे अपघात होऊ शकतो यामुळे ही माती आणि वाळू योग्य ठिकाणी ठेवण्यात यावी अशी सूचना देखील करण्यात आली.

महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी महाड शहरात पूर आणि आपत्ती काळात सर्व उपाययोजना केली असून. शहरात जंतुनाशक फवारणी, नागरिकांना शहरातील शाळा, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्थलांतरित केले जाते असे स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ . बिरादार यांनी देखील तालुक्यात आरोग्या बाबत सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत असे सांगितले. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध पुरवठा केला जाईल. महाड तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना देखील करण्यात आल्या. दरडींबाबत माहिती घेण्याचे काम ग्राम सुरक्षा यंत्रनेबाबत घेणें सुरू असल्याचे पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी सांगितले. महाड औद्योगिक क्षेत्रात देखील पाईपलाईन लिकेज होऊन प्रदूषण होणार याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुका कृषी विभागाच्या वतीने भात बियाणे वाटप सूरु असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नेहेमीप्रमाणे भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी मात्र अनुपस्थित राहिले.