कोंढव्यात युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर;डॉकटर आपल्या दारी संकल्पनेतून अनेक नागरिकांची मोफत तपासणी

664

कोंढवा प्रतिनिधी,

येथिल युवा सेना , भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्सच्या माध्यमातून डॉकटर आपल्या दारी या मोहिमेतून कोंढवा खुर्द मधील वेताळ चौक, शिवनेरी नगर तसेच गावठाण परिसरातील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद बाबर,मा. नगरसेवक भरत चौधरी,मा. आ. महादेव बाबर यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
ह्रदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनची तपासणी, रकदाब (गरज पडल्यास), डोके दुखी अंगदुखी,ताप, खोकला आहे अशा नागरिकांची तपासणी करण्यात आली.तसेच ज्या लोकांना तीव्र लक्षणे आढळतात त्यांनाआण्णा भाऊ साठे येरवडा येथील तपासणी केंद्रात पाठविले जाऊन पुढील उपचार केले जातात.

यावेळी डॉ.संतोष गायकवाड, डॉ.कविता शेळके, डॉ.जयदीप कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी अतुल चौधरी,महेंद्र भोजने, संजय बाबर, जितेंद्र भाडळे, गोरख दिक्षित, अभिजित कापरे,कांता भाडळे, दगडू गोते, दत्ता गोते, कुणाल कामठे, उमेश थोरात, शोहेब शेख,नितीन गोते आदी उपस्थित होते.