कडापे येथील सर्प मित्राने दिले आजगरला जीवदान

528

गिरीश भोपी /प्रशांत म्हात्रे 

निसर्ग संतुलन आणि सापांची संख्या ही खूप  कमी होत चालली आहे निसर्गाच्या रक्षणासाठी संतुलन हे अतिशय महत्वाचा आहे अन्नसाखळी सुद्धा  खुप महत्वाची कारण अन्नसाखळीत एक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो
सर्पमित्र यांचे निसर्गाच्या रक्षणासाठी योगदान हे अतिशय बहुमोल आहे सतत निजध्यास देऊन प्राण्यांच्या काळजी घेऊन जीवदान देत असतात. कडापे येथील रहिवाशी रुपेश म्हात्रे यांच्या घरात अजगर आला. त्यांच्या घरात कोंबडयांचा  अधिवास आहे ,त्या ठिकाणी अजगराने मुसंडी मारली. प्रत्यक्षात या अजगरने त्या कोंबड्या फस्त करायला सुरुवात केली. सर्पमित्र रिषीकेश हा कडापे गावातील fon या संस्थेशी निगडित असणारा सर्पमित्र याच कडापे येथील रहिवासी असल्याने ह्या आजगरला पकडणे खूप सोयीस्कर झाले .त्याने  आजगरला पकडल्या नंतरच त्याने  जवळच असणाऱ्या जवल्याच्या कडापे येथील डोंगरात सुखरूप रित्या त्याला सोडले. यामुळे या सर्पमित्राचे परिसरात नागरिक कौतुक करीत आहेत.  आजगरला जीवदान