योगेश टिळेकर सारखा कर्तुत्वान आमदार मिळाला – गडकरी

3691

अनिल चौधरी, पुणे-

आमदार योगेश टिळेकर यांनी केलेले उत्तम काम  यामुळे मतदारसंघाला कर्तृत्ववान ,अतिशय चांगला, तडफदार, संघर्षशील, लोकांच्या समस्यांसाठी कार्यशील असणारा आमदार मिळाला असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक, रस्ते ,बांधकाम व जलवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी टिळेकर यांचे कौतुक करताना केले.                            पुणे मनपाच्या वतीने कात्रज – कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळील ६ मजली पार्किंग इमारत तसेच अभ्यासिका व ग्रंथालय यांचेभूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते..यावेळी व्यासपीठा वर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक,आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर , नगरसेविका रंजना टिळेकर,वीरसेन जगताप, वृशाली कामठे, डॉ. सायली कुलकर्णी, सुभाष जंगले आदी उपस्थित होते.

 महाराष्ट्र समृद्ध व संपन्न झाला पाहिजे, यासाठी प्रथम पाण्याचा प्रश्न सुटायला हवा. पाण्याच्या प्रश्ना बरोबरच वीज,रस्ते,याचे दळणवळण साधले तर उद्योग येतील व तरुणांच्या हाताला काम मिळेल,नोकऱ्या मिळतील. याच उद्देशाने पुणे विभागात 85 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत,असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक, रस्ते ,बांधकाम व जलवाहतूक मंत्री नितिन गडकरी यानी केले.     

https://www.facebook.com/malharnews.live/videos/395772587899812/?t=0

      गडकरी म्हणाले पाच रस्त्यांच्या कामाची मागणी केली, ते सर्व रस्ते मंजूर केले आहेत, त्यासाठी चौदाशे कोटी रुपये मंजूर केले आहेत.पुणे विभागात ८५ कोटी रुपये मंजूर केलेत. पुण्याचा रिंग रोड झाला तर वाहतुकीची समस्या सुटणार आहे. मी राज्याचा मंत्री असताना पुणे मुंबई रस्ता केला. केंद्रात मंत्री झाल्यावर महाराष्ट्रासाठी५ लाख कोटींची कामे करीन असे सांगितले,पण आता ही कामे साडे साहा लाख कोटींवर गेले. एवढेच नाही तर मी एरिकेशनचाही मंत्री आहे, मी२० हजार कोटी रुपये पंतप्रधान सिंचन योजनेमधे २६ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि१०८ प्रकल्प बळीराजा या योजनेसाठी १६ कोटि ४० लाख रुपये मंजूर केले आहेत. राज्य समृद्ध झाले पाहिजे.पाणी, वीज, रस्ते चांगले असले पाहिजेत, दळणवळण सुधारले तरच उद्योग येतील व तरुणांच्या हाताला काम मिळेल.आसा पुनरुच्चार ही गडकरी यांनी केला.                      आपल्याकडे पार्किंगची मोठी समस्या झाली आहे. रस्त्याच्या बाजूला वाहने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यापुढे रस्त्यावर गाड़ी उभीकेली तर 500 रुपये दंड होणार आहे, गाडीचा फोटो ज्यांनी काढला त्याला ५०टक्के रक्कम देण्यात येणार आहे,लवकरच या संबंधी कायदा येणार आहे. नगरसेवकांनी आपल्या भागात लोकांना पार्किंग करायला सांगावे असे आवाहनही गडकरी यांनी केले. त्यांनी इस्कॉन मंदिराबाबत ही गौरवोद्दार काढले. इथले लोक भाग्यवान आहेत, आपल्याला भौतिक प्रगतीच नव्हे तर नैतिक आणि आध्यात्मिक प्रगती करायची आहे, ही प्रगती झाली नाही तर पाश्चिमात्य देश्यासारखे नैराश्य येईल.सुखी,समृद्ध, संपन्न शक्तिशाली राष्ट्र निर्माण करत असताना विज्ञानाचा उपयोग करत विकास केला पाहिजे. संस्कारातून माणूस घडत असतो. असे सांगून गडकरी म्हणाले देहु आळंदी ते पंढरपुर ,तुळजापुर, अक्कलकोट, गंगापुर, माहुर हे आपले श्रद्धास्थाने आहेत. या रस्त्यांचीही कामे केली जाणार आहेत. गंगा नदी पुढच्या मार्च संपण्याच्या आत १०० टक्के शुद्ध होईल.श्रद्धा परमेश्वरावर असावी पण अंधश्रद्धा नसावी.असे सांगून गडकरी म्हणाले राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकसाची कामे हती घेण्यात आली आहेत.त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. याप्रसंगी हडपसर मतदार संघातील नागरिक, भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.