भाजपचे विधानपरिषद आमदार पडळकर यांचा निषेध

440

अर्जुन मेदनकर, आळंदी 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा आळंदी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी त्वरित माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डि.डि.भोसले पाटील, आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, रुपाली पानसरे, पुष्पाताई कुऱ्हाडे, धनंजय घुंडरे, सिध्देश कुऱ्हाडे, सागर रानवडे, निसार सय्यद, श्रीकांत काकडे, राणी रणदिवे,ज्योती पाटोळे, संगिता पाटोळे ,आळंदी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, प्रसाद बोराटे उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांनी बहुजनांबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे मात्र त्यांनी प्रत्येकवेळी बहुजनांवर अन्याय, अत्याचार केला आहे. ते दोन समूहामध्ये मतभेद निर्माण करतायेत अशी प्रतिक्रया देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबद्दल चुकीचे विधान केले होते. यामुळे आळंदीत या घटनेचा निषेध करण्यात आला.यावेळी घौषणा देऊन निषेध करण्यात आला.