भावाच्या खुनातील आरोपी मोकाट ; शेतकऱ्याचे अश्रू अनावर
अनिल चौधरी , पुणे
कै. मनोज पवळे यांचा ११ वर्षांपूर्वी शेतीच्या वादातून पाच गोळ्या घालून खून करण्यात आला होता . परंतु गुन्हा घडनूही आरोपीना अटक न झाल्याने मयत मनोज पवळे यांचे बंधू महेंद्र पवळे यांनी आत्मदहनाचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. खुन्यातील आरोपी आज अकरा वर्षांनंतरही मोकाट फिरत असल्याने ते हतबल झाले असून गरिबांना कोणी वाली नाही का, असा उद्दिग्न सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आपण शेतकरी कुटुंबातील असून गरीब असल्याने न्याय मिळत नसल्याचे अश्रू डाळत पत्रकारांना विचारत होते यामुळे उपस्थित पत्रकारांना सुद्धा गहिवरून आले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, कै मनोज पवळे हे ११ वर्षांपूर्वी कामावर जात असताना पिरंगुट ते मुकाईघाट परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाच गोळ्या घालून खून करून पळून गेले. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील धार्मिक विधी करण्यात आले. याबाबत आम्ही कुटुंबातील काही व्यक्तींची संशयित म्हणून नावे दिली , परंतु पौड पोलिसांनी वेळेत चार्जशीट ९० दिवस उलटून गेल्याने दाखल न केल्याने आरोपी अजून मोकाट फिरत आहे. यानंतर मी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केले यावेळी मला गृहविभागातर्फे पुढील तपास सी आय डी करेल असे पत्र दिले व तपास करण्यास सुरुवात केली .परुंतु आज अकरा वर्ष उलटूनही सी आय डी देखील कोणालाही अटक करू शकली नाही. त्यामुळे आपल्या देशातील गोरगरीब शेतकऱ्याना कोण न्याय देणार ? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. आणि आता जर मला न्याय मिळाला नाही तर मी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
याबाबत आम्ही पौड पोलिसांशी आणि पुणे ग्रामीण दलातील सी आय डी च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो झाला नाही.



