ओंकार माने यांनी १० म्युझिक व्हिडिओ आणि एका वेब सिरीजची घोषणा करत मराठी चित्रपटसृष्टीत नव्या पर्वाची सुरुवात केली!
पुणे :
मराठी मनोरंजन विश्वात नव्या अध्यायाची सुरुवात करत सुर्या मिडीया प्रोडक्शन
तर्फे द ग्रॅड प्रोजेक्ट घोषणा आणि दिवाळी सेलिब्रेशन हा भव्य सोहळा हॉटेल प्राईड प्रिमियर, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमात सुर्या मिडीया प्रोडक्शनचे संस्थापक, निर्माते-दिग्दर्शक ओंकार हनुमंत माने यांनी तब्बल १० म्युझिक व्हिडिओ अल्बम्स आणि १ वेब सिरीज अशा एकूण ११ प्रोजेक्ट्सची घोषणा एकाच मंचावर केली — जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व आणि प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
-या कार्यक्रमाचे मान्यवर उपस्थित पाहुणे : संदीप मोहिते पाटील – मराठी चित्रपट निर्माते, आनंद पिंपळकर – सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व निर्माते, मेघराज राजे भोसले – अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, राहुल ओदक – तेलुगू व मराठी चित्रपट निर्माते, सौजन्य निकम – मराठी चित्रपट निर्माती, पूर्वा शहा – अभिनेत्री व निर्माती, नितीन टाकळकर – सुप्रसिद्ध व्यावसायिक, तुषार शेलार – दिग्दर्शक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी . “मी एकनाथ” या वेब सिरीज ची कथासूत्र: प्रेरणादायी पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित कथा आहे. यामध्ये आनंद पिंपळकर, नवोदित अभिनेता चेतन रहाणे व मराठीतील काही दिग्गज कलाकार काम करत असून ओंकार हनुमंत माने यांनी दिग्दर्शन केले आहे.
या वेब सिरीज व्यतिरिक्त – माहोल मुली, होनेवाली वाईफ, ठिणगी, मराठी पोरी, पैंजण, गावभर बोभाटा, दाजी जरा ऐका, मधाळ, जिव्हार तू आणि पाखरू अश्या
दहा म्युझिक व्हिडिओ अल्बम्सची घोषणा ही करण्यात आले.
या सोहळ्यात ११ प्रोजेक्ट्सच्या अनावरणाबरोबरच यावेळी पत्रकारांचा सन्मान करित दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.
मराठी मनोरंजन क्षेत्रातील नव्या युगाची सुरुवात म्हणून हा सोहळा ओंकार माने यांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.



