Saturday, November 22, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेमहाबिझ २०२६ : पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठ

महाबिझ २०२६ : पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठ

पुणे : GMBF Global या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाबिझ २०२६ या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्त्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे. या विशेष पत्रकार परिषदेला ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जी एम बी एफ) ग्लोबल दुबई युएईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर*, श्री विवेक कोल्हटकर(महासचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री नितिन सास्तकर (आयोजन सचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री अशोक सावंत (मीडिया डिरेक्टर – जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री. दिलीप खेड़ेकर(मीडिया और संचार, जीएमबीएफ ग्लोबल (इंडिया), श्री देवा सोळंकी, श्री. जितेंद्र जोशी इत्यादी मान्यवर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

पुणे आणि महाबिझ यांचा संबंध
पुणे हे महाराष्ट्रातील उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र असून येथील उद्योजकांनी नेहमीच नव्या संधींचे स्वागत केले आहे. दुबईमध्ये ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महाबिझ २०२६ मध्ये पुण्यातील उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक, आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
महाबिझचे पुण्यातील रोड शो ७ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन आणि MCCIA येथे होणार असून, त्यातून पुण्याच्या उद्योजकांना या जागतिक मंचाशी थेट जोडण्याची संधी मिळेल.
पुणेकरांचा अपेक्षित सहभाग
पुण्यातील उद्योगसंघटना, चेंबर्स आणि बिझनेस नेटवर्क्स — जसे की MCCIA, Saturday Club, BBNG आणि GIBF — यांना महाबिझ २०२६ मध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
यामधून पुण्याचे व्यवसाय जगत निर्यात, आयात, तंत्रज्ञान भागीदारी आणि गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रांत GCC आणि आफ्रिकन बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकते.
पुण्याला मिळणारा फायदा
• जागतिक नेटवर्किंग: दुबईमार्गे नवीन बाजारपेठा आणि ग्राहक मिळवण्याची संधी.
• सहभागातून शिकणे: नव्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय मॉडेल्सशी परिचय.
• गुंतवणुकीच्या संधी: निधी, व्हेंचर फंड आणि ट्रेड फिनान्स यामधून विस्तार शक्य.
• संयुक्त उपक्रम (Joint Ventures): महाराष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील प्रत्यक्ष सहकार्य.
यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत?
GMBF Global पुण्यातील सर्व प्रमुख उद्योगसंघटना, तरुण उद्योजक आणि व्यावसायिक गटांशी बैठक घेऊन त्यांना महाबिझमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
पुण्यातील कंपन्यांना अर्ली बर्ड डिस्काउंट (२०% सवलत) मिळवून नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जाईल, ही ऑफर ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वैध आहे.
या वर्षीचे वेगळेपण काय?
गेल्या आठ अधिवेशनांपेक्षा महाबिझ २०२६ अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूपाचे आहे.
• १५+ देशांचा सहभाग,
• ८००हून अधिक उद्योजक,
• तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष केंद्रित
या वर्षी पहिल्यांदाच “Young Leaders Panel” आणि “Buyer–Seller Meet” सारखे विशेष सत्र आयोजित करण्यात येत आहेत.

GMBF Global चे मत
“महाबिझ ही केवळ परिषद नाही, ती महाराष्ट्रातील उद्योग आणि जगातील संधी यांच्यातील सेतू आहे,” असे डॉ. सुनील मंजरकर, अध्यक्ष, GMBF Global यांनी सांगितले. “पुण्यासारख्या शहरांतील उद्योजकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा, कारण पुढील दशकातील व्यवसायवाढ ही जागतिक संधींवर आधारित असेल.”

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mahabiz2026.com
चौकशीसाठी लिहा: mahabiz2026@gmbfglobal.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!