अनिल चौधरी, पुणे,
भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या घराण्यांपैकी एक, १९२ वर्षांचा उज्ज्वल वारसा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ यांनी आज पुण्यात त्यांच्या आधुनिक उप-ब्रँड ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’चे भव्य उद्घाटन केले. ही ‘लाइटस्टाईल’ची सुरुवात ‘पीएनजी’च्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, ज्याद्वारे ब्रँड आपल्या नवीन पिढीतील दागिने खरेदीदारांशी अधिक जोडले जातील. ‘लाईटस्टाईल’च्या माध्यमातून कमी वजनाची, डिझाईन-केंद्रित आणि दररोज वापरता येणारी फाईन ज्वेलरी तयार करण्यात आली आहे.
१८ आणि २२ कॅरेट सोन्यांत तयार करण्यात आलेले ‘लाइटस्टाईल’ हे २५ ते ४० वयोगटातील स्वाभिमानी स्त्रियांसाठी पारंपरिक किंवा भेटवस्तू देण्याकरिता नाही तर त्यांच्या स्टाईलचा खास भाग म्हणून हे डिझाईन करण्यात आले आहे. ऑफिस मीटिंग्स, कॅज्युअल गेट-टुगेदर्स, फेस्टिव्ह प्री-सेलेब्रेशन्स आणि छोट्या खास प्रसंगांसाठी, ‘लाइटस्टाईल’ मध्ये अशा मिनिमलिस्ट; पण दर्जेदार आणि सहजपणे वापरता येतील अशा दागिन्यांचा समावेश आहे. ‘लाइटस्टाईल’चे आणखी दोन दालन खराडी आणि वाकड, पुणे येथे २२ जून २०२५ रोजी सुरू करण्यात येणार आहेत या दोन्ही दालनांचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत होईल.
भारतात कमी वजनाच्या फाईन ज्वेलरीची मागणी सातत्याने वाढत आहे. यामागे वाढती सोन्याची किंमत, महिलांची प्रमुख खरेदीदार म्हणून तयार होत असलेली ओळख, तसेच आधुनिक जीवनशैलीस अनुरूप डिझाइनयुक्त आणि व्यावहारिक दागिन्यांची गरज हे घटक आहेत. १४ आणि १८ कॅरेट सोन्याचे दागिने आता दैनंदिन वापरात मोठ्या प्रमाणावर पसंतीस येत असून, प्रामाणिकपणा, परवडणारी किंमत आणि डिजिटल सुलभता देणारे ब्रँड्स दागिने क्षेत्रात आघाडी घेत आहेत. ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ हा ब्रँड अशा वेगाने वाढणाऱ्या श्रेणीत भावनिकदृष्ट्या जुळणाऱ्या स्थानिक दृष्टिकोनासह आणि मजबूत बहुमार्ग योगजनेसह प्रवेश करत आहे.
‘‘लाइटस्टाईल’च्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या बदलत असलेल्या दागिन्यांच्या गरजांसोबत जुळवून घेत आहोत, ‘भारतात विशेषतः शहरी भागात हलक्या वजनाच्या, स्टाइलिश आणि दैनंदिन वापरातील दागिन्यांची मागणी आता फक्त एक ट्रेंड राहिलेली नाही, तर ती एक प्रबळ श्रेणी बनली आहे, ‘लाइटस्टाईल’ला या क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनवणे हा आमचा उद्देश आहे, जिथे प्रामाणिकता, डिझाईन आणि रोजच्या वापरातील उपयुक्तता यांचा सुंदर संगम होतो.’’ असे ’पीएनजी ज्वेलर्स’चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.‘‘सोहळ्यांतील जड दागिन्यांपासून रोजच्या वापरासाठीच्या सहज उपलब्ध होणाऱ्या सुंदर दागिन्यांमध्ये असलेली पोकळी भरून काढणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. ‘लाइटस्टाईल’चा प्रत्येक दागिना तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या गतिशी जुळवून घेतो आणि एक हळूवार पण ठसा उमटवणारे शैली विधान तयार करतो. दागिने हलके, रोजच्या वापरातील असले तरी आम्ही त्यांच्या डिझाईनबाबत गंभीर आहोत,” असे ‘पीएनजी ज्वेलर्स’चे ई- कॉमर्स, ग्राहक सेवा व्यवस्थापन, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, मार्केटिंग प्रमुख, श्री. हेमंत चव्हाण म्हणाले.
—
वित्तीय वर्ष २०२५–२६ मध्ये महाराष्ट्रात १२ स्वतंत्र ‘लाइटस्टाईल’ स्टोअर्स उघडणे ही या ब्रँडची रिटेल योजना आहे, ज्यामध्ये पाच स्वतःची दालन आणि सात फ्रँचायझी दालनांचा समावेश आहे. २०३० पर्यंत, ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ देशभरात १०० दालनांचा विस्तार करणार आहे. यात फ्रँचायझी दालनांचा समावेश असेल. (www.pngjewellers.com](http://www.pngjewellers.com ) वरच्या पीएनजीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी संपूर्णपणे जोडलेले असतील, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग, स्टोअर एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट्स आणि लाइव्ह इन्व्हेंटरी दृश्यमानतेचा लाभ मिळेल.



