आळंदीत कर्तृत्ववान महिलांचा महिला दिनी सन्मान

315

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालकमंदिर या विभागांत महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या निमित्त मातापालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
प्रसंगी विधितज्ञ अनिता शेटे, डॉ. मनिषा रंधवे, उद्योजिका साधना सस्ते, कवयित्री जयश्री रोहनकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. महिला दिनी मान्यवरांचे स्वागत आणि महिलांचे हस्ते सरस्वती माता प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देत दिन विशेष विशद केले. उपस्थित महिला पदाधिकारी यांच्या कार्याचा गौरव स्त्री व्यक्तिमत्त्वांचा सन्मान ध्यास फाउंडेशन व प्रशालेच्या वतीने उत्साहात झाला. महिला दिनानिमित्त माता पालकां साठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील तीन विजेते पारितोषिक प्राप्त अनुक्रमे वैशाली गावंडे, शितल होळकर, रोहिणी या तीन रांगोळी विजेत्यांचा सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला. पालक प्रतिनिधी आम्रपाली साबळे यांनी प्रशालेतील कामा विषयी, विद्यार्थ्यांच्या अभ्यास, शिस्त या बाबतीत भूमिका सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
विधितज्ञ अनिता शेटे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.मनिषा रंधवे यांनी महिलांना आरोग्य सांभाळण्यास आवश्यक सल्ला दिला. उद्योजिका साधना सस्ते यांनी सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन दिले. जयश्री रोहनकर यांनी स्त्री या विषयावर सर्वांना समजेल अशा भाषा शैलीत मनोगत शब्दबद्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल उंबरकर, स्मिता रंधवे, धनश्री राळे, शोभा बोंबटकर, कल्पना मोहिते आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मनिषा दरेकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी केले. आभार प्रशालेच्या उपशिक्षिका विद्या खराडे यांनी मानले.