जागतीक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

384

पुणे प्रतिनिधी,

जागतिक महिला दिनानिमित्त मातृछाया जनसेवा फाउंडेशन व साक्षी विजन यांच्या माध्यमातून आरोग्य विभागात आपले काम करुन लोकांना सेवा देऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या रणरागिनी , अपोलो हॉस्पिटल येथील सर्व महिला भगिनी डॉक्टर नर्सेस हाउसकीपिंग स्टाफ व इतर महिला भगिनी यांना फाउंडेशनच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच अण्णासाहेब मगर कॉलेज येथील महिला प्राचार्य यांनाही सन्मानित करण्यात आले व तसेच होंदा शोरूम येथील महिला भगिनी यांनाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात. आले यावेळी मातृछाया जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेश भाऊ अहिरे व हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर नर्सेस सर्व स्टाफ उपस्थित होते व तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घडून आला.व महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष सिनेअभिनेत्री श्वेतांबरी एन. यांनी महिलांना आजच्या काळात कशाप्रकारे आपण आपली स्वतः स्वाभिमानाने कसे जगावे लोकांना गरजू लोकांना कशा प्रकारे सेवा देता येईल आपल्या माध्यमातून या अशा सर्व गोष्टी संदर्भात योग्य ती अशी माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व प्रशस्त पत्र देऊन केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना सत्कार करून गौरविण्यात आले.