हडपसर परिसरातील खड्ड्यांमुळे अपघात प्रमाण वाढले

280

व्हिजन हडपसर चे निषेध आंदोलन, पालिका अधिकाऱ्यांची दखल”

पुणे (प्रतिनिधी)
हडपसर परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अपघात घडण्याचे प्रमाण वाढलेले असताना महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून बघ्याची भूमिका घेत आहेत, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हिजन हडपसर च्या वतीने खड्ड्याचे प्रतिकात्मक पूजन करून श्राद्ध घालण्यात आले व महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला, व्हिजन हडपसर चे आंदोलन संपताच तात्काळ पालिकेची गाडी खड्डे बुजविण्यास आल्याने “मॅगी” पेक्षा लवकर सेवा मिळाल्याने नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.
आठवड्यापेक्षा जास्त काळ हडपसर मध्ये सतत पाऊस सुरू आहे, सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, वाहनचालक खड्ड्यात पडण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे अनेकांना दुखापती झाल्या असून खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, सर्व माजी नगरसेवक झाल्याने आणि निवडणूक लांबणीवर पडल्याने हौशी नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे,

महापालिका प्रशासन खड्डे बुजविल्याची आकडेवारी रोज जाहीर करत आहेत प्रत्यक्षात खड्ड्याचे प्रमाण घातक असल्याने अपघात वाढले आहेत, पालिका अधिकारी एसी कार्यालये सोडत नसल्याने त्यांना सर्वसामान्यांचे होणारे हाल दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी व्हिजन हडपसर कृती समितीने आज हडपसर मधील रस्त्यावर आंदोलन केले, याप्रसंगी व्हिजन हडपसर चे सदस्य अनिल मोरे, हरीश टेमगिरे, तुषार पायगुडे, दिगंबर माने, दिपक कुदळे, पल्लवी सुरसे, दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दांत घोषणा देऊन निषेध करण्यात आला, हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गोपनीय विभाग चे नितीन शिंदे यांच्या तत्परतेने पालिकेचे उपअभियंता शैलेश क्षीरसागर यांनी धाव घेतली व तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले, नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेतल्याने व्हिजन हडपसर च्या वतीने त्यांचे आभार मानले.

आंदोलन करूनही जर हडपसर खड्डेमुक्त जाहले नाही, तर व्हिजन हडपसर, माननीय उच्च नायालयात जनहित याचिका दाखल करणार
जनहित याचिकेत सर्व हडपसर वासियांचा सहभाग असेल.

व्हिजन हडपसर ही एक सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणारी हडपसर परिसरातील निरपेक्ष आणि निःपक्ष संस्था आहे.
सर्वसमावेशक, लोक सहभागातून, सर्वांना घेऊन, लोकहित आणि जनसेवा हे संस्थेचे उद्देश आहे.
सामान्यांचा आवाज मांडणारी चळवळ उभा राहत आहे.