सिध्दबेटात महागायिका कार्तिकी गायकवाड यांचे हस्ते वृक्षारोपण

265

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भजनसम्राट संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड शिष्य परिवार यांचे वतीने तसेच महागायिका कार्तिकी गायकवाड यांचे संकल्पनेतून संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड यांचे वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकीतून आळंदी येथील सिध्दबेटात महागायिका कार्तिकी गायकवाड परिवाराचे हस्ते वृक्षारोपण उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, भजनसम्राट संगीतरत्न पं. कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड,कैवल्य गायकवाड, शेतकरी बचाव आंदोलन अध्यक्ष गजानन गाडेकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, माऊलीदास महाराज, दिनकर तांबे, भागवत काटकर, दिगंबर महाराज नरवडे,संजय महाराज कावळे यांचेसह पं. कल्याणजी गायकवाड शिष्य व परिवार मोठ्या संख्येने वृक्षारोपणास उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून पं. कल्याणजी गायकवाड यांचा वाढदिवस आळंदीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात सामाजिक, धार्मिक, संगीत श्रवण मेजवानी, तीर्थक्षेत्र आळंदीतील संत लीला भूमीत पर्यावरण पूरक वृक्षारोपण उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण प्रसंगी संगीत सम्राट कल्याण महाराज गायकवाड, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचा आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने शेतकरी बचाव आंदोलनचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी वन विभागातून वृक्ष उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून आळंदीतील सिध्दबेटात आळंदी जनहित फाऊंडेशनसह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संतुलनाचा तसेच परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबविला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हंणून संगीतरत्न कल्याणजी गायकवाड व परिवार तसेच मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह उपस्थित शिष्य परिवार यांचे हस्ते उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण उपक्रमाचे संयोजन आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले.