चल जिंदगी चित्रपट २६ मे रोजी चित्रपट गृहांमध्ये

135

विवान फिल्मझ प्रोडक्शन चा चल जिंदगी हा रोड ट्रिप वर आधारित एक अनोखा चित्रपट आहे तीन प्रमुख पात्रांच्या भोवती फिरतो. ही पात्रे म्हणजे सना, साहिल आणि सदानंद. सना ही यूएस मधून भारतात संगीत शिकण्यासाठी आलेली एक कलाकार आहे. साहिल एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि सदानंद एक ६० वर्षीय गृहस्थ आहेत जे नुकतेच रिटायर्ड झाले आहेत.

या चित्रपटात हे तिघे हार्ले डेव्हीसन वर रोड ट्रिप ला विविध ठिकाणांवरून निघतात व एकमेकांना प्रवासादरम्यान भेटतात. पुढील पूर्ण प्रवासात हे तिघे सोबतच प्रवास करताना दिसून येतात. मुंबई पासून सुरु झालेलं त्यांचा प्रवास राजस्थान, पंजाब आणि लडाख असा दाखवण्यात आला आहे.
या प्रवासात तिघेपण आपल्यातल्या स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. सनाला राजस्थान मधील लोकसंगीतात नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात तेथे तिला छोटू राणा नावाचा एक लोक कलाकार भेटतो व तो देखील यांच्या सोबत प्रवासास निघतो.
चित्रपटाच्या चार प्राथमिक पात्रांच्या अनोख्या रोड ट्रिपवर आधारित, चल जिंदगी हा तुमचा नेहमीचा रन-ऑफ-द-मिल चित्रपट नाही जो बॉलीवूडमध्ये सहसा येतो.
संजय मिश्रा, विवेक दहिया, शॅनन के व बालकलाकार विवान शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत व विवेक शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात एकूण पाच गाणे आहेत. हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.