अनिल चौधरी, पुणे
प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील सुप्रसिध्द मल्टीस्पेशेलिटी अत्याधुनिक, अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ओम हॉस्पिटलच्या वतीने 21 ते 31 जानेवारी दरम्यान महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सर्व गरजू रुग्णांची हृदयरोग व मधुमेहाची तपासणी ओम हॉस्पिटल मध्येच तज्ञ डॉक्टारांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरा सोबत पुणे जिल्ह्यातील गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले आहे. डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की, एका सर्वेनुसार भारतात दरवर्षी अंदाजे 7 लाख 50 हजार व्यक्तींचा मृत्यू हद्यरोगाने होतो. तरुण वयातच मधुमेहामुळे हृदयरोग बळावतो. त्यामुळे योग्य वेळी मधुमेह व हृदयरोगाचे निदान होणे आवश्यक आहे. स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून 21 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित शिबीरात ओम हॉस्पिटलमध्ये मधुमेह आणि ई.सी.जी तपासणी करण्यात येईल आणि तज्ञाव्दारे औषधोपचाराविषयी मोफत सल्लाही देण्यात येणार आहे.
बदलत्या जीवन शैलीमुळे मधुमेह आणि हृदयरोग रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे आरोग्यावर दुषपरिणाम होतो. म्हणूनच मधुमेहा सोबत हृदयरोगाचे वेळीच निदान होने आवश्यक असते. म्हणूनच मधुमेहाची तपासणीबाबत जनजागृती व्हावी ही सामाजिक बांधिलकी जपत ओम हॉस्पिटलच्यावतीने या मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. अशी माहिती ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनिल अग्रवाल यांनी दिली. ओम हॉस्पिटल हे सी.जी.एच., सी.एस.एम.ए., पी.सी.एम.सी. धन्वंतरी, पी.एम.पी. एम.एल. तसेच सर्व मेडीक्लेम्स आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करिता मान्यताप्राप्त आहे. अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली. आरोग्य शिबीराबात अधिक माहितीसाठी 7774049690, 7774049691, 7774049698 या नंबरवर संर्पक साधावा.
ओम हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सुनिल अग्रवाल हे महाराष्ट्रातील नामांकित कार्डिओलॅजिस्ट असून आतापर्यंत त्यांनी दहा हजारांच्यावर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. तसेच ते अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॅजीचे फेलो असल्याने जगभरात होणार्या प्रगत उपचार व तंत्रज्ञान त्यांना त्वरीत उपलब्ध होते आणि त्याचा फायदा रुग्णांना होतो.
डॉ. अशोक अग्रवाल हे वरिष्ठ लॅप्रो.एंडोस्कोपिक सर्जन असून जनरल सर्जरीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अॅनोरेक्टल सर्जरीमध्ये त्यांना विशेष प्राविण्य अवगत आहे.
ओम हॉस्पिटलची स्थापना 2003 साली झाली तेव्हापासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. येथे 80बेडेची सुविधा आहे. येथे माफक दरात योग्य तो उपचार दिला जातो. ओम हॉस्पिटलमध्ये एक नाही दोन नाही, तब्बल 150 प्रकारच्या विविध आजारांवर औषणोपचार केले जातात. निरनिराळ्या आजारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी सर्व प्रकारचे तज्ञ व अनुभवी डॉकटर्स, सक्षम दिान सेवा, गुणवंत स्टाफ, अत्याधुनिक उपकरने असल्याने एकाच छताखाली सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. येथे 24 तास तातडीची व तत्पर सेवा, कॅथ लॅब, इंटरव्हेनशनल कार्डीओपॉजी शस्त्रक्रिया, दुर्बीणी द्वारे सर्व शस्त्रक्रिया, गुद्द्वाराच्या शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक आस्थिरोग शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागाची सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी व नामांकित डॉक्टर उपलब्ध आहे. यामध्ये स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, अॅक्सिडेंट व ट्रामासेंटर, ह्दयरोग विभाग, मल्टीस्पेशालिटी ओपीडी, सुसज्ज मिजीओथेरापी विभाग व डायग्नॉस्टिक विभाग वेगवेगळे आहेत.