अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गरोदर

1862

गिरीष भोपी,पनवेल

अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला सहा  आठवड्यांची गरोदर केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध  38/2020 भा द वि कलम 376 (२) (एल), POSCO ३,४,५,६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , याबाबत तिच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

 याबाबत पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मतिमंद मुलगी  हीचेवर कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे अज्ञानपणाचा व मतिमंद पणाचा फायदा घेऊन तीचेवर वारंवार बलात्कार करून ती सहा आठवड्यांची गर्भवती राहिल्याने  गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी बाबत काहीही माहीत्ती नसताना, तसेच पीडित मुलगी मतिमंद असल्याने ती आरोपी बाबत उपयुक्त माहिती सांगू शकत नसल्याने पोलीस आयुक्त  नवी मुंबई, पोलीस सह आयुक्त , गुन्हे शाखेचे उपायुक्त  नवी मुंबई यांनी सदरचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून तो उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शनपर सूचनावजा आदेश दिले होते, नमूद गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये गुन्हे शाखा कक्ष 2 कडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसरात्र अथक परिश्रम करून यातील पीडित मुलीस कौशल्याने विश्वासात घेऊन पीडितेने दिलेली माहिती व वर्णनाच्या आधारे तसेच प्रत्यक्ष साक्षीदार व खास खबरीवरुन डेरवली, भातन, कसळखंड भागातील संशयितांचे फोटो काढून पीडितेस दाखवले. नमूद संशयितांपैकी इसम नामे सुमित कृष्णा जुमारे वय 22 वर्ष रा. भातान, ता. पनवेल, जि.रायगड यानेच सदरचा गुन्हा केलेबाबत पीडित मुली कडून खात्री करण्यात आली असून नमूद आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अज्ञानपणाचा व मतिमंद पणाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे सांगून कबूल केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत गुन्हे शाखा कक्ष 2 चे सहायक पोलिस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड व पोह. साळुंखे, प्रमोद पाटील, रणजित पाटील, संजीव पगारे, सचिन पवार, पोलिस नाईक अभय सागळे, सुनील कुदळे, प्रफुल्ल मोरे, परेश म्हात्रे, सचिन पाटील आणि कक्ष 2 चे सर्व पथक यांनी नमूद गुन्हा उघडकीस आणला असून नमूद गुन्ह्यात आणखीन काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेला वर आरोपीस पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करुन पनवेल तालुका पो. ठाणे यांचे ताब्यात देऊन सदर गुन्ह्या शिताफीने उघडकिस आणला आहे.