दशरथ दादा काळभोर यांच्या तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

584

कोंढवा प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री.दशरथ काळभोर (मा.सदस्य जिल्हा परिषद, पुणे) यांनी येवलेवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, सोशल-फिजिकल डिस्टन्सचे सर्व नियम पाळत गर्दी टाळत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. बुधवार दि.२७ मे ला सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. यामध्ये ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. काळभोर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

1

राज्यात दररोज साधारण पाच हजार रूग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते श्री.सदाशिव कुंदेन यांनी ब्लड बँकेचे नियोजन केले. ओम ब्लड बँकेने यामध्ये सहकार्य केले.