आळंदीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून १० दिवस कडक लॉकडाउन  

201

अर्जुन मेदनकर,आळंदी 

आळंदी नगरपरिषद हद्दीतुन कोरोना हद्दपार करण्यास आळंदी नगरपरिषद, महसूल व पोलीस,आरोग्य सेवा प्रशासनाने शहरातील नागरिकांना प्रभावी लॉकडाउन चे १४ ते २४ जुलै २०२० या काळात नागरिकांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.सोमवार (दि.१३) अखेर आळंदीत 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून ६ रुग्ण बरे होऊन परतले आहेत.तर एका महिला रुग्ण कोरोनाने मयत झाला आहे.
 आळंदी शहरासह पंचक्रोशीतील काही गावं मध्ये १४ जुलै पासून कडक प्रभावी पणे लॉकडाउनची कार्यवाही जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन खाली सूचनादेश प्रमाणे केली जाणार आहे.यासाठी आदेश देण्यात आले असून आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे तसेच जिल्हा पोलीस व महसूल यांचे सूचना आदेशाने शहरात लॉकडाउनचे कामकाज प्रभावी पणे राबविले जाणार आहे. नागरिकांनी दरम्यानचे काळात अत्यावश्यक काम खेरीज विना परवानगी पास फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ मर्यादित वेळेत दूध विक्री,पेपरचे वितरण होणार आहे. याशिवाय मेडिकल अत्यावश्यक आरोग्य सेवा २४ तास सुरु राहणार आहेत.इतर सर्व प्रकारची आस्थापना दुकाने बंद राहणार आहेत.
 आळंदीत नव्याने वडगाव रस्त्या लगत असलेल्या तुळजा भवानी मंगल कार्यालया समोरील रस्त्यावरील इमारतीत एक रुग्ण आढळून आल्याने येथील रुग्ण संख्या आता २३ झाली आहे.या मुळे आळंदीतील रुग्ण संख्या सतत वाढत असल्याने नागरिकांनी लॉक डाउन च्या नियमांचे पालन करून आळंदी कोरोना मुक्त करण्यास प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. शहरात येत्या १० दिवसांत लॉकडाउन असल्याने या बाबतची जनजागृती नागरिकां मध्ये करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी मरकळ रस्त्यावरील दोन ठिकाणी रुग्ण आढळून आल्याने सदरचे संबंधित परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून संबंधित इमारत परिसरात क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.नुकतेच आणखी एक रुग्ण गोपाळपूर परिसरात सापडल्याने या भागातील पुजाऱ्याचे घराचे परिसरात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. संबंधित पुजारी यांचे संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील सर्वाना होमक्वारंटाइन करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.
 आळंदीत आजपर्यंत कोरोनाचे ३० रुग्ण आढळूनआले आहेत. यात एक महिला मृत झाली आहे. ६ रुग्ण बरे होऊन घरी परातल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी दिली. उर्वरित २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय आळंदीतील कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील कोरोनाने बाधित असल्याने त्यांचेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  
 खेड प्रांत संजय तेली यांनी गेल्या ८ दिवसांसाठी आळंदीत लॉकडाउन  अत्यावश्यक सेवा वगळून जाहीर केला होता. कारवाई अभावी प्रभावी ठरला नाही. आता १० दिवसांसाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन जाहीर केला असून विना कारण फिरना-यांवर कारवाई केली जाणार असल्याचे इशारा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिला आहे. यामुळे नागरिकांनी घरा बाहेर विनाकारण येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आळंदीतील वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १० दिवस नागरिकांना सुरक्षित घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंकुश जाधव यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतला आहे. आळंदीत आता जाधव यांचे प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.