ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांची निवड जाहीर

538

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पाच वर्षांसाठी विश्वस्तांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आल्याची माहिती सचिव अजित वडगावकर यांनी दिली.

ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांचे अध्यक्षतेखाली संस्थेची सन 20-21 ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत संस्थेच्या पुढील पाच वर्षांसाठी विद्यमान

विश्वस्तांची फेरनिवड करण्यात आली. यामध्ये आजीव सभासद गटातून सुरेश वडगांवकर, विलासराव कुऱ्हाडे, अजित वडगांवकर यांची, आश्रयदाता सभासद गटातून ज्ञानेश्वर पाटील यांची तसेच सर्वसाधारण सभासद गटातून पांडुरंग कुऱ्हाडे, प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे या सात विश्वस्तांचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांसाठी या विश्वस्तांची फेरनिवड झाल्याचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी खजिनदार ज्ञानेश्वर पाटील यांनी ऑडिट रिपोर्ट व अंदाजपत्रकाचे वाचन केले. विश्वस्त प्रकाश काळे यांनी आभार मानले. सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . यावेळी नवनिर्वाचित विश्वस्तांचे ॲड. राजेंद्र मुथ्था, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, महिंद्रभाई कोठारी यांनी अभिनंदन केले. कोरोंना महामारीचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांच्या अधीन राहून घेण्यात आली. पसायदानाने सभेची सांगता झाली.