वृक्ष लागवड काळाची गरज संवर्धंनाणे मानवी जीवन सुरक्षित :- संदीप देवरे

709

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सर्वत्र वृक्षारोपण, संवर्धन व या चळवळीतून पर्यावरणाचे रक्षण केल्यास मानवी जीवन सुरक्षित होईल. प्रत्येक कामगार, व्यक्ति यांनी एकेक वृक्ष लावून संवर्धन करावे असे असे आवाहन मरकळ येथील डायनाऍक्सल इंजिनिअर्स उद्योगचे संचालक संदीप देवरे यांनी केले.

मरकळ येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या डोंगररांगांचे विस्तीर्ण परिसरात डायनाऍक्सल इंजीनीअर्स प्रा. लि. या कंपनीचे वतीने गेल्या पाच वर्षा पासून वृक्षारोपण उपक्रम सामाजिक बांधीलकी, सामाजिक उत्तरदायित्व जोपासत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

या प्रसंगी संचालक संदीप देवरे, संचालक शैलेंद्र मिश्रा, सरपंच भानुदास लोखंडे, उपसरपंच संतोष भुसे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत लोखंडे, युवा उद्योजक महेंद्र लोखंडे, सागर लोखंडे, युवा उद्योजक विजय लोखंडे, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर,पर्यावरण व सुरक्षा व्यवस्थापक पदमाकर कवडे, गोविंद तौर यांचेसह योजना व्यवस्थापक, सर्व कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

संचालक देवरे म्हणाले, प्रत्येक कामगार, व्यक्ति नागरिकांनी किमान एक तरी वृक्ष लावावे तसेच ते जगवावे. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचे आपण देणं आहे, या कृतज्ञतेच्या भावनेतून कंपनी मधील प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवावे असे आवाहन त्यांनी केले. डायनाऍक्सल इंजीनीअर्स तर्फे गेल्या पाच वर्षा पासून हा उपक्रम राबविला ७५० वर वृक्षारोपण केले आहे. यावर्षी १६० वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमात सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व कामगारांचे त्यांनी कौतुक केले.

वृक्ष लागवड हि एक व्यापक चळवळ झाली असून जगा, जगवा अन जगू द्या, हा जीवन मंत्र आत्मसात करून सर्वानी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल मरकळचे सरपंच भानुदास लोखंडे यांनी कौतुक केले. यावेळी वृक्ष लागवड करीत सहभागी होत सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले. कंपनी तर्फे पर्यावरण व सुरक्षा व्यवस्थापक पद्माकर कवडे यांनी सर्व कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने आभार मानले.